शिराढोण प्रतिनिधी / शिवकांत पाटील डांगे -
शिराढोण येथे कर्मचारी सेवा संघाच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी शिराढोणचे सरपंच खुशाल पाटील पांडागळे तर प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम बंगाल येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आसलेले गौरी शेळगाव ता.नायगाव जि.नांदेड चे भुमिपुत्र योगेश पाटील बावणे हे होते.
आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हाधिकारी बावणे साहेब म्हणाले मी शेळगाव सारख्या ग्रामीण भागातून जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचलो, जेव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरात जातो, त्यावेळी खूप समस्या आसतात.शिराढोण मध्ये कर्मचारी सेवा संघाचे कार्य अतिशय उल्लेखनीय आहे.
त्यांनी गावातील स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गावातच अभ्यासिकेची निर्मिती केली. मी जेव्हा इंजिनिअरिंग झाल्यानंतर युपीएससी ची तयारी करण्यासाठी पहिल्यांदा मी जेव्हा दिल्लीत गेलो.त्यावेळी बाहेर राज्यासह - सबंध भारतातून मोठ्या मोठ्या परिवारातील पैसै वाले विद्यार्थी देखील तिथे होते.
यांच्यापुढे आपला निभाव लागणार की नाही, आपण मनात धरलेले ध्येय साध्य होणार की नाही या विचाराने मी पार खचून गेलो होतो. पण अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण मनात आली ज्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी कोणताही फौजफाटा नसतांना अनंत संकटातून मार्ग काढत स्वराज्याचे निर्माण केले.आणि त्याच क्षणी मन घट्ट करुन एकच निर्धार केला की आपण कलेक्टर झाल्याशिवाय स्वस्त बसणारच नाही. मग पहिल्या प्रयत्नात पी.आय.आणि दुसऱ्याच प्रयत्नात जिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे
अध्यक्षीय भाषणात शिराढोणचे सरपंच खुशाल पाटील पांडागळे म्हणाले शिराढोण मध्ये शिक्षणाची चळवळ दिवंगत लोकनेते कै. माधवराव पाटील पांडागळे साहेबांनी सुरुवात केली. आणि ती चळवळ पुढे नेत बालाजी पाटील पांडागळे साहेबांनी गावात पदवी पर्यंतच्या शिक्षणाची सोय केली. मी सरपंच या नात्याने कर्मचारी सेवा संघाच्या इमारतीच्या बांधकामासाठी पंधरा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देतो. अशी घोषणा केली. व व्यंकटेश शिंदे यांनी ग्रंथालयास लागणारी एक गुंठा जागा देण्याची घोषणा केली.देशात एकिकडे दिव्यांची व फटाक्यांची दिवाळी साजरी होत आसतांना शिराढोण मध्ये मात्र ज्ञानाची दिवाळी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात गावातील नवनियुक्त कर्मचारी, निवृत्त कर्मचारी , गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला आहे
या कार्यक्रमास महाष्ट्राचे निवृत्त शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे सेवा निवृत्त मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजीराव पाटील कपाळे, गट शिक्षणाधिकारी बालाजी शिंदे साईनाथ पाटील कपाळे ,कृषी अधिकारी सचिन पा.कपाळे, तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव देवणे उपसरपंच पांडुरंग पवार, ग्रामपंचायत सदस्य धर्माजी पा.कपाळे, मुक्ताराम पा.पांडागळे, मनोज जमदाडे, दत्तप्रसाद पा.पांडागळे , धोंडिबा पा.पांडागळे सह शिराढोण मधिलमान्यवर मंडळी व विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते...

0 Comments