Header Ads Widget

कौठा तांडा येथील अवैध देशी दारू विक्री विरोधात गांवकरी आंदोलनाच्या पावित्र्यात,राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकारी अवैध विक्रेत्यांना देतात पाठबळ ? -

हिमायतनगर :  नागोराव शिंदे : 

तालुक्यातील कोटा तांडा गावात विना परवाना अवैध देशीदारु भरदिवसा खुले आम मोठया प्रमाणावर विक्री केली जात असून दिवसभर चालू असलेल्या या दारू विक्रीमुळे मद्यपींच्यां संख्येत मोठी वाढ होऊन गांवकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत जिल्हा पोलीस प्रशासन आणि अधिक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेडचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

मौजे कौठा तांडा परिसरातील नागरिकांच्या तोडून ऐकवयास मिळत आहेत.हिमायतनगर तालुक्यातील मौजे कौठा तांडा गावात अवैध देशी दारू जोमात चालु असल्यामुळे मौजे कौठा तांडा परीसरा तील अनेक लोकं व्यसनाला लागुन अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे.ही सत्य परिस्थिती आहे.
या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन बेकायदेशीर होत असलेली अवैध देशी दारू विक्री बंद नाही, केल्यासआम्ही सर्व गांवकरी मंडळी लोकशाही मार्गाने बेमुदत अमरण उपोषण करू अशी माहिती नामे अरुण चंद्रु राठोड यांनी आमच्या तालुका प्रतिनिधीला बोलताना दिली आहे.

देशी दारुच्या आहारी जाऊन ग्रामीण भागातील सुशिक्षीत वर्ग सुद्धा दारु पिऊ लागला आहे.दारु पिऊन रोज बायका-लेकरांना मारहाण करणे,दारु पिऊन रोड रोमीओ बनुण भांडणतंटे,वाद निर्माण करुन सामान्य माणसाला त्रास देणं हे रोजच चालू असल्याचे दिसून येते आहे.तसेच तालुक्यातील बहुतेक सर्व मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावांंत अवैध देशी दारुचे धंदे खुलेआम चालू असल्याचे दिसून येतआहे.परंतु याकडे जिल्हा पोलीस प्रशासन आणि अधिक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेडचे साफ दुर्लक्ष असल्यामुळे मौजे कौठा तांडा येथील ग्रामस्थां सोबत महिलांनी व गांवकऱ्यांनी मौजे कौठा तांडा येथे कित्येक वर्षा पासून सुरु आहे
 अवैध देशी दारू विक्री तात्काळ थांबवून खुले आम सुरु असलेली अवैध देशी दारू विक्री व वाहतूक कायमची बंद करावी,यासाठी हिमायतनगर पोलिसांना मौजे कौठातांडा येथील गावकऱ्यांनी सांगितले होते.मात्र हिमायतनगर पोलिसांकडून अद्यापही कारवाई करण्यात येत  नाही कौठा तांडा येथील नागरिकांकडून तक्रार देण्यात आली हिमायतनगर पोलिसां कडून कारवाई करण्यात येत नाही ? जनसामान्य माणसाच्या तोंडुन ऐकायला मिळते तालुक्यातील बहुतेक मोठी संख्या असलेल्या गावात अवैध देशी दारु विक्रीचे खुले आम,बिनधास्त धंदे जोरदार व जोमात चालुअसल्याचे दिसून येत आहे
हिमायतनगर पोलिसांना व राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेडला खरचअवैध धंद्याची माहिती नसेल का?जर माहिती असेल तर मग अवैध धंदे करणार्यांवर कार्यवाही करुनअवैध धंदे का बंद करत नाही?याअवैध धंदे करणाऱ्यांना कोणाची साथअसेलअसे अनेक प्रश्न नागरिकांमधून बोलल्या जात आहे.

कौठातांडा गावात हिअवैध देशी दारुचे विक्री चढ्यादराने जोमात चालु असल्याने संबंधित पोलीस अधिकारी व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क उपविभाग किनवट  यांनी लक्ष देऊन कौठा तांडा येथील सुरु असलेली अवैध देशी दारू कधी बंद करणार असे  मौजे कौठा तांडा परिसरातील नागरिकांना मधून बोल्या जातआहे. तसेच या संदर्भात मौजे कौठा तांडा येथील रहिवासी असलेले अरुण चंद्रु राठोड मार्फत ग्रामपंचायत कौठा तांडाच्या लेटर पेड वरुन समस्त गांवकऱ्यानी पोलिस ठाण्यात दिनांक २४ ऑक्टोबर २०२२ रोजी तक्रार दिली आहे

Post a Comment

0 Comments