माधव पवार
राजकारणात जसे दोन पडतात तशाच पद्धतीने ग्रामीण भागातही नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर व नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार हे दोन्ही राजकीय पुढारी असले तरी खेड्या पाड्यात त्यांचे दोन गट ? आहेत असल्यामुळे नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथील सेवा सहकारी सोसायटीच्या प्रशासकीय मंडळ स्वरूपात नियुक्त करण्यात आले यात भाजपाच्याच खासदार गटाचे वर्चस्व निर्माण झाले आहे
तालुक्यातील मांजरम येथील सेवा सहकारी सोसायटीच्या संदर्भात पाहिले तर जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या बाजूने जुन्ना गट असल्याचे सांगण्यात येते आणि आमदार राजेश पवार यांच्या सौभाग्यावती पूनमताई पवार ह्या मांजरम जिल्हा परिषद गटाच्या विद्यमान सदस्या होत्या परंतु भाजपाच्या विरोधात भाजपा असे चित्र ग्रामीण भागात पाहवयास मिळत आहे मांजरमच्या सेवा सहकारी सोसायटीची मुदत संपल्याने अध्यक्ष गोविदराव शिंदे तर उपध्यक्ष ओम श्रीपतराव गायकवाड संचालक बाबाराव शिंदे व्यंकटराव केते रामराव मलदोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
जिल्ह्याचे खासदार विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटांनी प्रशासकीय मंडळावर नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे आमदार राजेश पवार यांच्या विरोधात खासदार प्रताप पाटील चिखलीकर असे दोन सूत्री गट असल्याचे सदरच्या नियुक्ती वरून दिसून येत असल्यामुळे एका कमळावर दोघांचा डोळा अशी गत निर्माण झाली आहे

0 Comments