नायगाव फास्ट न्यूज :- माधव पवार :-
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहून पत्रकारांना भारतीय राज्य घटनेत एक महत्त्वाचे स्थान दिले ते म्हणजे चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार या सदरील पत्रकारांच्या माध्यमातून व लेखणीतून समाज घडवण्याचे काम मोठ्या प्रमाणात होते व देशाची दिशा पत्रकारा मुळे स्वावलंबी बनत असते असे दैनिक तुफान क्रांतीचे जिल्हा प्रतिनिधी नांदेडचे धम्मानंद भेदेकर चिटमोगरेकर यांचे मत आहे
राजकीय पुढाऱ्याच्या माध्यमातून विकासाला गती देण्यासाठी व विकास घडविण्यासाठी पत्रकारांच्या लेखणीच्या माध्यमातून दिशा घडते व काम होते आणि हा चौथा आधारस्तंभ बिन पगारी फुल अधिकारी म्हणल्या प्रमाणे वर्षभर राजकीय पुढाऱ्यांच्या मोठे पणात बातम्या लावण्यासाठी व्यस्त असते --
परंतु दिवाळी सारखे सण आल्याच्या नंतर कोणत्या ही दैनिकाचा पत्रकार असो की साप्ताहिकांच्या पत्रकार असो वर्षभर लावलेल्या बातम्याचे काही तरी फळ मिळावे बातम्या दैनिकातुन प्रकाशित करतात पत्रकार जाहीरात मिळावी म्हणून पुढाऱ्याच्या कार्यालयांना हेलपाटे मारतात तरी एका ही रुपयाची जाहिरात मिळत नसल्यामुळे पत्रकाराचे खची करण होत असल्याचे ही त्यांचे म्हणे आहे
राजकीय पुढारी यांच्याकडे दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा हजाराच्या जाहिरातीची पत्रकार अपेक्षा करते परंतु सदरच्या नेते मंडळी कडून ऐन वेळेला जाहिरातीचे सहकार्य मिळत नसल्याने सदरचा पत्रकार हा नाराजी व्यक्त करत असताना बहुतांश दिसून येत असल्यामुळे ज्याने पत्रकारांना जाहिराती दिले नाही अशा नेते मंडळीच्या बातम्या वर्षभर स्वप्ननातं ही प्रकाशित करण्यात येऊ नये अशी खंत दैनिक तुफान क्रांतीचे जिल्हा प्रतिनिधी नांदेडचे धम्मानंद भेदेकर चिटमोगरेकर यांनी व्यक्त केली आहे

0 Comments