Header Ads Widget

आदर्श,अष्टपैलू व्यक्तिमत्व : शिवाजी जाधव


     नांदेड : - प्रल्हाद आयनेले सर - 

जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता. मुखेड जि. नांदेड या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुखेड तालुकाध्यक्ष शिवाजी नागोराव जाधव उमरदरीकर यांचा आज दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकृर्तत्वाचा आढावा लेख  प्रसिद्ध करीत आहोत..... 
मानवी जीवनात सत्ता,संपत्ती व कीर्ती याची प्राप्ती करणे हे प्रत्येक मानवाचे उद्दिष्ट असते. ते साध्य झाले तरी यशस्वी जीवन म्हणता येत नाही. जे व्यक्ती स्वतः व स्वतःचे कुटुंब सुखी करून इतरांनाही सुखी करण्याचे अविरत कार्य करून समाजमनावर खोल ठसा उमटवतात की तो ठसा काळालाही कधीच पुसून टाकता येत नाही त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजकारण, समाजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रभावी आणि आदर्श, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले शिवाजी नागोराव जाधव उमरदरीकर होत.

नरसिंह देवतेच्या पायथ्याशी वसलेल्या मुखेड तालुक्यातील उमरदरी सारख्या खेडेगावात शिवाजी जाधव यांचा जन्म १ नोव्हेंबर १९६१ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण प्रतिभा निकेतन हायस्कूल नांदेड येथे तर पुढील शिक्षण पीपल्स कॉलेज नांदेड येथे झाले.
मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये नांदेड जिल्ह्यातील उमरदरीच्या जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे नाव अग्रक्रमाने पुढे येते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी नागोराव जाधव यांनी स.न.१९५९ साली जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या रूपाने सर्वसामान्यांना शिक्षण मिळावे, शिक्षणापासून समाज वंचित राहू नये अशी धारणा ठेवून शिक्षणाची पायवाट घालून दिली त्यांचे कार्य शिवाजी जाधव यांनी पुढे चालून सामाजिक सेवेचे वृत्त घेऊन वडील नागोराव जाधव यांच्यासह आपल्या घराण्याचे नाव उज्वल केले आहे.

नागोराव जाधव यांच्या अकाली निधनानंतर गेल्या २२ वर्षापासून शिवाजी जाधव हे जनता शिक्षण प्रसारक मंडळाची धुरा यशस्वीपणे हाताळत आहेत संस्थेअंतर्गत चालणाऱ्या उमरदरी, नवीन नांदेड सिडको, महावीर सोसायटी नांदेड येथील शाळा व उच्च महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती पहाता शिक्षण महर्षी नागोराव जाधव यांनी उभी केलेली शैक्षणिक संस्था व त्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम शिवाजी जाधव हे नेटाने करीत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील एक प्रभावी अष्टपैलू, व्यक्तिमत्व म्हणून शिवाजी नागोराव जाधव यांचे नाव घेतले जाते. त्यांनी अनेक होतकरू, गरिब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी घेऊन त्यांचे भविष्य घडवण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात आणि अनेक नातेवाईक, मित्र, कार्यकर्ते यांच्यासाठी त्यांचा मदतीचा हात नेहमी तयार असतो तसेच अडचणीत असलेल्या अनेकांना त्यांनी आर्थिक मदतही केली, केलेल्या मदतीची वाचता त्यांनी कधी ही केलेली नाही हे विशेषः

शिवाजीराव जाधव यांनी राजकारणाचा मार्ग पत्करल्यानंतरही शिक्षण क्षेत्राशी असलेल्या संबंधाना कधीही बाधा येऊ दिली नाही. माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते एकनिष्ठपणे सामाजिक कार्य करीत आहेत ते एका पक्षापूर्ते मर्यादित असले तरी त्यांचा सर्व पक्षातील, सर्व क्षेत्रातील मान्यवरांसोबत सौहार्दतेचे संबंध आहेत. त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन ग्रामपंचायत उमरदरी व सेवा सहकारी सोसायटी जनतेने त्यांच्याकडे सोपोवली आहे.
 शिवाजीराव जाधव यांनी कोरोनाची भयंकर साथ असताना मुखेड  तालुक्यातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अनेक दिवस मोफत जेवणाची सोय करून देऊन सामाजिक बांधिलकी जपली तर मुखेड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना व निराधारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न सातत्याने के‌ला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुखेड शहरात रक्तदान शिबिरे आयोजित करून सामाजिक कर्तव्य पार पाडले तसेच अनेक वेळा नेत्र चिकित्साकाडून नेत्र तपासणी करून शेकडो नागरिकांना मोफत चेष्म्याचे वाटप करून गोरगरीब रुग्णांची सेवा केली आहे

      """  व सातत्याने करित असतात """
असे आदर्श ते व त्यांचे कुटुंब असून त्यांचे थोरले सुपुत्र रवी जाधव सिडको येथील शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयात उपप्राचार्य पदावर कार्यरत आहेत

तर द्वितीय चिरंजीव बॅरिस्टर राजीव जाधव यांनी इंग्लंड तेथून बॅरिस्टर पदवी प्राप्त करून दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात विधीज्ञ म्हणून सेवा करत आहेत तसेच त्यांची कन्या डॉ. श्रद्धा जाधव (वकील) ह्या एम.बी.बीएस, एमडी (मनोविकारतज्ञ) असून त्या एमजीएम रुग्णालय औरंगाबाद येथे सेवेत आहेत.
शिवाजीराव जाधव व त्यांच्या सौभाग्यवती कमल जाधव यांचे तीन्ही मुलांना घडवण्यात मोठे योगदान आहे.

 शिवाजी जाधव यांनी स्वतःमध्ये कधीही अहंकार बाळगलेला नाही. सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणे हा त्यांचा स्वभाव गुणविशेष आहे.आज तागायत शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आत्मविश्वासाने  कार्य करून ते यशस्वी झाले आहेत त्यामुळे ते कृर्तत्वान, अष्टपैलू व्यक्ति म्हणून सर्वपरिचित आहेत. यापुढेही त्यांच्याकडून शैक्षणिक, सामाजिक,राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य घडून ते यशस्वी व्हावेत

या अभिष्टचिंतनासोबत शिवाजीराव जाधव साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने निरोगी, दीर्घायुष्य लाभो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनस्वी प्रार्थना व कोटी कोटी  शुभेच्छा..! प्रल्हाद आयनेले, नांदेड 
  मो.न.९८९०६१६३०१- + 

Post a Comment

0 Comments