Header Ads Widget

तुम्ही काय रायगडचे आमदार आहात का ? नायगाव तालुक्यात किती नवीन प्रकल्प आणले हनमंत पाटील शिंदे नायगावकर

 
      माधव पवार 
राज्यातले राजकारण पाहिले तर सध्याच्या परिस्थितीत फार विचित्र झाल्याचे दिसून येत असले तरी विकास ही नावाची चीज ग्रामीण भागात राहिली नसल्यामुळे सोशल मीडियावर वायरल झालेली एक पोस्ट नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चाचा विषय चांगलाच रंगायला लागला असल्यामुळे शोशीयल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काय रायगड जिल्हाचे आमदार आहेत का ? अशी चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे 

नायगावच्या आमदारानी नांदेड जिल्ह्यामध्ये किती प्रकल्प आणले  आहेत व आले आहेत आणि आपल्या  तालुक्यामध्ये किती कंपनी आल्यात कृष्णूर एम आय डी सी येथे असे नायगाव तालुका मुनीम संघटना अध्यक्ष हनमंत व्यंकटराव पाटील शिंदे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार आहेत ते रायगड जिल्ह्याचे आमदार नाहीत असे चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असताना पाहवयास ऐकावयास मिळत असून अहमदनगर जिल्ह्यात व सोलापूर जिल्ह्यात आलेले आहेत

सदरील प्रकल्पाचा संबंध नांदेड जिल्ह्याशी काही येऊ शकत नसले तरी महाराष्ट्र राज्याचा अभिमान राज्यातील जनतेला असल्यामुळे सरकार कोणती ही असो राज्यात मोठ मोठाले प्रकल्प आले पाहिजे परंतु महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प बाहेर राज्यात जाऊ नये यांची ही काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे असे ही हनमंत पाटील शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे



Post a Comment

0 Comments