माधव पवार
भाजप सरकारच्या कार्यकाळात गोरगरीब जनतेसाठी व गरीब कुटूंबाला काही तरी शासनाची योजना मिळावी म्हणून जन सामान्य कुटूंबातील व्यक्ती अपेक्षा करीत असतात परंतु शासनाने गोर गरीब जनतेसाठी अगोदर सवलतीच्या दरात गॅस सॅलेंडरचे कनेक्शन दिले खरे परंतु त्यांचा जन सामान्य कुटूंबातील व्यक्तीवर मोठा परिणाम झाला असून अतिशय अल्प दरात मिळणार गॅस आता ग्रामीण भागात ११५० रुपयाला मिळत असल्यामुळे महागाईच्या भडक्यात जन सामान्य कुटूंब होरपळून जाताना दिसून येत आहे
राज्यातले राज्य कर्ते एवढ्या मोठया प्रमाणात महागाई वाढली असताना सुद्धा त्यावर कोणता ही पुढारी तोंड उघडण्यास तयार नाहीत परंतु ग्रामीण भागातील जनतेच्या हाताला काम नाही आणि घरगुती सदरचे गॅस घेण्यासाठी पैसे नाहीत सदरचे भाव गगनाला गेल्यामुळे खेड्यापाड्यात शेकडो चुली लाकडावरच पेटत असल्याचे वास्तव चित्र पाहावयास मिळत असून गोरगरीब जनतेनी कसा गॅस खरीदी करावा असे ही बोलल्या जात आहे
सुद्धा महागाईचा भडका काय करता थांबत नसल्यामुळे जन सामान्य माणूस सॅलेंडर घेण्यासाठी धजावत नाही सर्वात सोपा गॅस म्हणजे लाकडाच्या चुली शिवाय गरीब कुटूंबाला सद्यातरी पर्याय नसल्याचे जन सामान्य माणसातून बोलल्या जात असून सरकार नको त्या घोषणा करत असतो आणि जनता डोळे झाकून योजनेचा लाभ सुरुवातीला घेतात काही कालावधीत नंतर त्यांचा परिणाम साऱ्या जनतेवर पडत असल्यामुळे गॅस पेक्षा लाकडाच्या चुली सोप्यात पडत असल्याचे महिला वर्गातुन बोलल्या जात आहे

0 Comments