Header Ads Widget

मुबंईच्या शिवतीर्थावर शिवसेना प्रमुख्याच्या दसरा मेळाव्याला अफाट जनसागर उसळल्याने इतिहास घडला अख शिवतीर्थ झाले शिवमय !!


        माधव पवार 
नायगाव फास्ट न्यूज - नांदेड / नायगाव -

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमाला आलेले शिवसैनिकाची  मुंबईच्या शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्याला अफाट शिवरायाच्या मावळ्याचा जनसागर उसळला असल्यामुळे महाराष्ट्राच्या " इतिहासात " इतिहास घडला आहे मुंबई येथील अख्ख शिवतीर्थ " शिवमय "झाल्याचे दिसून आले आहे 
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा विचार करून सदरचा जन समुदाय शिवतीर्थावर जमला होता दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जमलेल्या महिला व पुरुष तरुण मंडळींना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे कुटुंब असे मानले आहे
मुंबईच्या दसरा मेळाव्यासाठी शिव सैनिकाची गर्दी जमविण्यासाठी आपआपल्या गटाचे खासदार आमदाररानी मोठे परिश्रम घेतले राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिंदे गटाच्या खासदारासह आमदाराने मुबई मोठया प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले आहें
शिवसेना एक गट मात्र दोन आणि दसरा मेळावे सुद्धा दोन एक शिवतीर्थावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा भव्य दसरा मेळावा संपन्न झाला तर राज्याचे मुख्यमंत्री विद्यमान एकनाथ शिंदे यांच्या गटाचा बी के सी मैदानावर संपन्न झाला या दोन्ही गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती मुंबईच्या दसरा मेळाव्याला जात असलेल्या लोकांना काही पत्रकार मंडळींनी विचारपूस केलं आहेत 

मुबंई येथे दोन दसरा मेळावे आहेत तुम्ही कोणाच्या मेळाव्याला जाणार शिंदे गटाच्या की ठाकरे गटाच्या मेळाव्याला जाणार ? सदरच्या लोकांनी स्पष्ट सांगितले आहे की दोन्ही नेते आमच्या जवळच्या आहेत दोन्ही गटाच्या मेळाव्याला आम्ही जाण्या पासून अलिप्त राहणार आहोत



Post a Comment

0 Comments