Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील रुई बु येथील शंकर गिरी महाराज यांच्यावर साधु संत महंत यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार !!

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथील रहिवासी असलेले स्वा शंकर भुजंगा शिंदे उर्फ शंकर गिरी महाराज यांचे दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान हृदयय विकाराच्या झटक्याने निधन झाले ते मृत्यू समयी ५० वर्षाचे होत्यावर दिनांक १९ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान श्री क्षेत्र सिद्ध पंढरपूर देवस्थान रुई बु येथे संत हरिओम बाबा यांच्या विचारतुन सदरील ठिकाणी अंत्यविधी करण्यात आली आहे
तालुक्यातील रुई बु येथील शंकर गिरी महाराज यांच्या अंत्यविधीसाठी जिल्हासह तालुक्यातील भाविक भक्त साधू संत मंडळी व गावकरी मोठया संख्येने उपस्थित राहून अंत्यदर्शन घेतले यावेळी सुप्रसिद्ध संत हरिओम बाबा, यांच्यासह श्री १०८ महंत यदुबन महाराज कोलंबीकर, श्री १०८ महंत पर्यावीर महाराज डोलारा, श्री संत आनंदबन महाराज निळेगव्हानकर, श्री संत दयाळ बन महाराज कोलंबी, श्री अवधूत भारती महाराज सातेगांव, श्री नित्यानंद बन महाराज मनूर, सदानंद महाराज नागबराडी व दैनिक प्रजावाणीचे पत्रकार विकास भुरे यांच्या उपस्थित शंकर गिरी यांची अंत्यविधी करण्यात आली आहे
रुई बु येथील शंकर भुजंगा पाटील शिंदे यांचे विशेष नामकरण श्री संत हरिओम बाबा यांच्या डोळस विचारातून श्री क्षेत्र सिद्ध पंढरपूर रुई बु येथील येथे प्रथम हरिओम बाबा आले आणि सदरचा माळ म्हणजे लकडोबाचा माळ म्हणून ओळखले जात होते या ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम व भंडारे होत होते आणि  ही तर हरिओम बाबाची किमया असल्यामुळे एक प्रकारचे नंदनवन झाल्याचे दिसून येत आहे 
याच ठिकाणी श्री हरिओम बाबा आले आणि या माळाचे प्रथम नामकरण झाले ते म्हणजे श्री क्षेत्र सिद्ध पंढरपूर या या माळाला मोठी प्रसिद्धी हरिओम बाबामुळे व या विभातील गावामुळे या ठिकाणी शंकर भुजंगा शिंदे गेले आणि जास्त हरिओम बाबाच्या संपर्कात गेले आणि हरिओम बाबांनी त्यांचे नावाचे नामकरण करून शंकर गिरी महाराज असे केले असून नायगाव तालुक्यातील रुई बु येथील शंकर गिरी महाराज यांच्यावर साधु संत महंत यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे




Post a Comment

0 Comments