नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांच्या सूचने नुसार वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी मोटार सायकलचे चोरीच्या प्रत्येक ठिकाणी भेट देऊन माहिती काढण्याचा प्रयत्न केला मिळालेल्या माहितीनुसार मोटार सायकल चोरटे हे परभणी येथील असल्याची माहिती मिळाली व शोध घेतला असल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्या कडून सपोनि निलपत्रेवार यांचे कौतुक केल्या जात आहे
वजीरबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे विशेष पथक प्रमुख व वजीराबाद पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सपोनि संजय डी निलपत्रेवार यांनी पथकासह परभणी येथे जाऊन येथील अभिनास कुमार सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग परभणी व शहर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार कदीर शेख पोका निलेश कांबळे यांच्या मदतीने गुन्हेगाराचा शोध घेतला आहे
सदरचा गुन्हेगार शेख अरबाज उर्फ कोबरा शेख चाँद वय २४ वर्षा राहणार दर्गा रोड पारवागेट परभणी २. आरेजखान उर्फ अमेरा अयुब खान वय २८ वर्ष राहणार मोठा मारोती देशमुख गल्ली परभणी ३. मोहम्मद मुक्तदी मुक्का मोहंमद अधर वय ३१ वर्ष राहणार शाही मज्जीत स्टेडियम रोड परभणी हे तिघे जन मिळून आले त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता नमूद गुन्ह्यांतील ३० मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे
सपोनि संजय निलपत्रेवार यांना दिली असून यातील एकूण २१ लाख ८० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहीती सपोनि निलपत्रेवार यांनी नायागांव फास्ट न्यूजला दिली आहे
वजीराबाद पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकाचे विशेष प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक एस डी निलपत्रेवार पोलीस जेमादार दत्तराम जाधव, गजानन किडे, विजय कुमार नंदे, शरदचंद्र चावरे, संतोष बेलूरोड, व्यंकट गंगूलवार, रमेश सूर्यवंशी, अंकुश पवार, यांनी मोटार सायकल चोरीतील एकूण तीस मोटार सायकली उघडकीस अनण्यासाठी आरोपीचा शोध घेऊन बडिया कामगिरी केली आहे
सदरील आरोपी कडून वजिरबाद ठाण्याच्या हदीतुन ६ मोटार सायकली तर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत १ शिवाजी नगर पोलीस ठाणे ३ भाग्यनगर पोलीस ठाणे १ इतवारा पोलीस स्टेशन २ गंगाखेड पोलीस ठाणे जिल्हा परभणी ५ पोलीस ठाणे कदीम जालना २ पोलीस ठाणे परतूर जिल्हा जालना १ पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर जिल्हा बीड १ असे २२ गुन्हे उघडकीस आले असून आदीकचे गुन्हे गुन्हेगारा कडून उघड होणार होती अशी अपेक्षा पोलीसांनी केली आहे

0 Comments