नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे :-
महाराष्ट्र शासनाने नुकतेच अद्यावत केलेल्या महावनगाव ई नोंदणी प्रणाली मध्ये गाव पातळीवरील ग्रामपंचायत केंद्र चालकांनी कशाप्रकारे कामे करावीत याबाबत नांदेड जिल्हा सीएससीचे मास्टर ट्रेनिंग ट्रेनर हणमंत बसवदे यांच्यामार्फत दिनांक ६ ऑक्टोबर २०२२ गुरुवारी नायगांव पंचायत समिती सभागृहामध्ये महावनगावच्या माध्यमातून नमुना १ ते ३३ ची ई नोंद करणे या बाबद प्रशिक्षण देण्यात आले आहे
सदरील प्रशिक्षण हे नायगाव तालुका पंचायत समिती आपले सरकार सेवा केंद्राचे व्यवस्थापक प्रकाश महिपाळे यांच्या नियोजनातून आयोजीत करण्यात आले होते . यावेळी प्रशिक्षक हणमंत बसवदे यांनी त्यांचे सहकारी केंद्रचालक अविनाश पावडे यांच्या मदतीने एलसीडी प्रोजेक्टर च्या माध्यमातून महावनगाव , महा ई ग्राम , आर डी डी महाऑनलाईन नमुना नंबर ०१ ते ३३ विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले आहे
यावेळी शेषराव बेलकर रामेश्वर पवार , गंगाधर गंगासागरे संभाजी उपासे , विश्वंभर शिंदे , संभाजी पांचाळ , दिपक बच्छाव , हनुमंत कोरले , अनिल कांबळे, मालू झगडे , नागेश जाधव, शेख मौला, गजानन कदम, मारुती कदम , बालाजी मेहेत्रे , मलिकार्जुन कुंभार बालाजी वाघमारे, शैलेश जाधव, किरण हनुमंते , मीनाताई संगेपवाड ,सविता मोरे , गंगासागर सज्जन , मसरत शेख यांसह तीस ग्रामपंचायतीचे केंद्र चालक उपस्थित होते .

0 Comments