Header Ads Widget

जीवन जगण्याच्या पद्धती व त्यातील शुद्धीकरणाला .... किर्तन म्हणतात :- ह.भ.प.चंदू महाराज लाठकर !!


विशेष नायगाव प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :- 

जीवन जगण्याच्या पद्धत कशी असावी  त्यातील जीवन जगताना काही बाबतीत जीवनात शुद्धीकरणाला महत्व असते ते केवळ कीर्तनातूनच होते असे जीवन ज्यातून घडवले जाते त्यालावच किर्तन म्हणतात असे प्रतिपादन ह.भ.प.चंदू महाराज लाठकर यांनी केले ते शंकरराव लंगडापुरे लालवडीकर यांच्या तृतीय पुण्यसमरण सोहळ्यात कीर्तन हा विषय समजावून सांगताना कीर्तनातून बोलत होते
दि १८ ऑक्टोबंर लालवंडी कै .शंकरराव शिवरामआप्पा पाटील लंगडापूरे यांच्या तृतीय पुण्य स्मरणार्थ  हभप चंदु महाराज लाठकर यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रस्तुत किर्तन सेवेसाठी तुकोबां रायाच्या अभंगाची निवड व मांडणी अतिशय सर्मपक पणे त्यांनी केली संसाराच्या अंगी अवघेची वेसने , आम्ही या किर्तने शुध्द झालो या अभंगाचे अप्रतिम विवेचन त्यांनी आपल्या मधूर वाणीतून लाठकर महाराज यांनी केले आहे 
त्यांनी अनेक विनोदी किस्से व दृष्टांत दिले व उपस्थितांना मंत्रामुगद्ध केले संसाराचा पसारा मोठा असतो ते करता करता, सावरता सावरता खूप काही राहून जाते आणि माणूस मनासारखे झाले नाही म्हणून, कधी दुःखी तर कधी सुखी होतो या कार्यक्रमासाठी परीसरातील भजनी मंडळी , गायक, विष्णु तांदळीकरजर्नाधन बेद्रींकर,बालाजी चौधरी,इन्द्रे,मृदंगवादक विसू कोलंबिकर, बासरी वादक विजय दोर्णाचार्य,यांनी उकृष्ट साथ दिली आहे 
या प्रसंगी प्रमूख अतिथी, हानमंतराव पाटील चव्हाण माजी पंचायत समिती सदस्य, माधव आप्पा बेळगे माजी जि.प. सदस्य, देविदास पाटील बोमनाळे, बाळासाहेब पांडे,मनोज आरगुलवार,पवन गादेवार,गंगाधरराव पोलीस पाटील, शंकर कल्याण , माधव पाटील कल्याण,गंगाधर कल्याण, ह .भ.प. त्र्यंबक स्वामी गुरुजी, बालाजी भोसकर गुरुजी, चंद्रकांत अमलापूरे, विकास भुरे,वसंत माने ,बालाजी नागठाने, श्रीनीवास जवादवार शेठ, लाबशेटवार सावकार,  शंकर लाब्दे, संजय बोमनाळे,रणजित कुरे,शिवराज वरवटे, राजेश बेळगे यांच्यासह आदी उपस्थित होते 

कार्यक्रमाचे आयोजक बाबूराव पाटील लंगडापूरे माजी जि.प सदस्य भगवान पाटील लंगडापूरे आडत व्यापारी असो  अध्यक्ष ॲड नारायण लंगडापूरे राजेश लंगडापुरे मोहन लंगडापुरे या सह व्यापारी मित्रमंडळ गावकरी आदी उपस्थित होते महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments