माधव पवार
नांदेड जिल्ह्यासाठी कर्तुत्वान आणि कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून लाभलेले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नांदेडच्या जिल्हा कृषी कार्यालया समोर नायगाव लोहा कंधार मुखेड तालुक्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी पिक विमा कंपनीच्या विरोधात नुकसानीच्या २५ टक्के जास्त विमा दीपावलीच्या पूर्वी देण्यात यावे म्हणून दिनांक २० ऑक्टोंबर २०२२ रोजी उपोषणास बसले होते या संदर्भात नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून विमा कंपनीची सदरच्या अमरण उपोषणाने झोप ही उडाली असल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले आहे
जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच ९३ मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतील २५ टक्के अग्रीम रक्कम विमा कंपनी कडून मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येते यात सोयाबीन कापूस, ज्वारी, तूर या चार पिकाला नुकसानीच्या २५ टक्के आगाऊ भरपाई मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून शेतकरी पुञ संघर्ष समितीच्या आमरण उपोषणा नंतर नांदेड जिल्ह्याला ४०० कोटी रुपये पिक विमा २५ टक्के मंजुर करण्यात येत असून जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या लेखी आश्वासना नंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे

0 Comments