Header Ads Widget

मोट गेली नाडा गेला गेला सौंदर कणा सहा बैल नांगर आता दिसेल का हो पुन्हा ? - मा. नितीश वाघमारे कृष्णूरकर !!

     माधव पवार 
पुरातन काळातील हेल गेला कासरा गेला गेली शर्यत बैल गाडीची मोगरी गेली हातणी गेली गेली मळणी धान्याची 
वावडी गेली उफननी गेली गेली धार धान्याची भुसारा गेला कलवड गेला lगेली इर्जिक नांगराची वाडगं गेलं खळं गेलं गेली शान झोपाट्याची सावड गेली, बलुतं गेलं गेली राखुळी गुरांची हौद गेला सारन गेलीगेली बारव जुनी दिसेनाशी झाली आहे 
वढवान गेलं रहाट गेल शेंदू कसं पाणी ? मेड गेली कुड गेला गेला वासा आढं कुळव गेला डुब्बं गेल फराड गेलं पुढं खुरवत गेला, खळं गेल चंद्राचं ते तळं गेल हरणाची गाडी गेली मामाची पण माडी गेली हेल गेला गंज गेली 
करडईचा फड गेलाअंगणात लावलेला भला मोठा वड गेला बोरं गेली जांभळं गेली गेला रानमेवा खंबीर होती असे सुप्रसिद्ध शाहीर मा. नितीश उर्फ माधव वाघमारे यांचे मत आहे 
मराठी साहित्यात काही सुंदर कविता विहिरीच्या, मोटेच्या संबंधात आलेल्या आहेत. बहिणाबाईच्या कवितेत बैल आडोयला कना चाक सोंदर धाव आदींची सुंदर गुंफण आहे संत सावता माळी यांच्या एका अभंगात विहीर मोट नाडा पीक पाणी आदींचा उल्लेख आलेला आहे

कांदा मुळा भाजी |अवघी विठाबाई माझी ||लसूण मिरची कोथिंबीरी|अवघा झाला माझा हरी
ऊस गाजर रताळू|अवघा झालासे गोपाळू ||

मोट नाडा विहीर दोरी |अवघी व्यापिली पंढरी ||

सावता म्हणे केला मळा |विठ्ठल पायी गोविला गळा |

जूनी पिढी गावाकडे तेव्हा ! आता कुठं शोधायच्या गावाकडच्या वाटा प्रगतीच्या नावाखाली मोजू कसा तोटा ? सांग मित्रा, कधी आता गावाकडे जायच ताटलीत दुध भाकर चुरून मुरून खायचं यातले किती तरी शब्द आपल्याला भविष्यात आठवणार सुद्धा नाहीत हे मात्र नक्की आहे 

Post a Comment

0 Comments