नायगाव तालुक्यातील सालेगाव येथील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ मदत मिळवून देऊ तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले सदरची घटना ही दुर्दैवी असल्याने सदर कुटुंबाच्या पाठीमागे प्रशासन असल्याचे ही त्यांनी सांगितले कर्ज बाजारीसह सततच्या नापीकीला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असे आवाहन ही नायगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन शिंदे यांनी केले
शेतकऱ्यांनी अडचणीचा सामना करत स्वालंबी जीवन जगले पाहिजे असे हे ते नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
घरातील कर्ताधर्ता माणूस गेल्यामुळे सालेगाव व कुंटूर सर्कल परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
तालुक्यातील सालेगा व येथील घटनेची माहिती मिळताच कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे फौजदार संजय आटकोरे यांच्यासह पॉका ईश्वरे यांनी पंचनामा करून सदरचे प्रेत ताब्यात घेतले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे

0 Comments