Header Ads Widget

पुढाऱ्याच्या विकासाचा फुसका बार कृष्णूर ते बरबडा रस्त्या वरील वाहन धारकाची पाहून घ्या बेहाल संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला कोण ? जाब विचारणार ! -

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कृष्णूर ते बरबडा रस्त्यावर असलेल्या एका पानसर लवनीत शासनाने डाबंरी करणा बरोबर पूलाचे बांधकाम केले नसल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांना कमालीची वाहने चालविताना कसरत करावी लागत असल्यामुळे या जिल्ह्यातील पुढाऱ्याच्या विकासाचा फुसका बार उडाला असून या सदरील पुढाऱ्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यावर वाचक नसल्यामुळे सदरच्या अधिकाऱ्याचा मोकाट पणा झाला असल्यामुळे त्या अधिकाऱ्याना पूल बांधकामाच्या संदर्भात कोण ? जाब विचार असा प्रश्न जनतेसह वहान धारकांनी केला आहे

तालुक्यातील कृष्णूर ते बरबडा रस्ता हा बरबडा येथे लोकांना येण्या जाण्यासाठी अतिशय सोपा आणि सरळ असल्यामुळे या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले असले तरी गुटेदाराच्या मनमानी सह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे या रस्त्यावर दोन ते तीन ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले नसल्यामुळे सदरच्या डांबरीकरण बरोबर रस्त्यात असलेल्या पुलाचे बांधकाम ही करण्यात यावे अशी मागणी केली आहे

या विभागातील जनतेसह बरबडा गाववासीय व कृष्णुर येथील नागरिकासह वाहन धारकांनी केले असून या मार्गावरील पुल बांधले नसल्यामुळे वाहन धारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावे लागत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहेत
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह नायगाव विधानसभा मतदार संघाचे दमदार विद्यमान आमदार राजेश पवार यांनी खास लक्ष दिले तर या रस्त्या वरील पुलांचा प्रश्न सुटेल असे ही सदरील जनतेतून बोलल्या जात  आहे

या  सदर राजकीय पुढार्‍यांच्या दमदार नेतृत्वाखाली संबंधित विभागांच्या अधिकाऱ्याला सूचना दिल्यास सदरचे काम मार्गी लागेल असा विश्वास जनतेने व्यक्त केला असला तरी कृष्णुर ते बरबडा रस्त्याकडे खासदारासह आमदाराने सदरच्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दम लावला तर सदरचा रस्ता व पुलाचे काम एका महिन्यात पूर्ण होईल असा विश्वास ही जनतेनी व्यक्त केला आहे

Post a Comment

0 Comments