जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सुप्रसिद्ध असलेल्या प्रख्यात व्याख्यान कर्त्या ॲड मुक्ताई पवार यांचे व्याख्यान नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे दुर्गा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते सदरचा कार्यक्रम हा श्री सप्तश्रंगी सार्वजनिक दुर्गा महोत्सवाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमात पवार ताईच्या व्याख्यानाने घुंगराळा नगरी दंग झाल्याचे चर्चा चालू झाली असल्यामुळे महिला मंडळात आनंदाचे वातावरण व्याखानाने पसरले आहे
तालुक्यातील घुंगराळा येथील या कार्यक्रमाच्या ठिकाणी मुक्ताई पवार यांच्या तुफानी व्याखाने आख घुंगराळा नगरी हे गाव मंत्र धुंद झाल्याचे उपस्थितीत कार्यक्रमाच्या ठिकाणी दिसून आले आहें
येथील श्री सप्तश्रंगी सार्वजनिक दुर्गा महोत्सवाच्या कार्यक्रमा निमित्त ॲड तथा प्रख्यात व्याख्यात्या मुक्ताई पवार यांचे आगमन घुंगराळा नगरीत झाल्याच्या नंतर यावेळी दुर्गा महोत्सवाच्या निमित्ताने पवार ताई यांचे भव्य स्वागत व सन्मान करण्यात आला आहे
कार्यक्रमाच्या माध्यमातून ॲड मुक्ताई पवार म्हणाल्या असाच माझा शिवबा होता नवरत्नाची खान या गोड शब्दाच्या आवाजातून महिला मंडळाच्या व पुरुष मंडळीच्या माध्यमातून टाळ्यांच्या कडकडाटाची दाद पवार ताईच्या व्याख्यानाला मिळाली असल्याचे दिसून आले आहे
घुंगराळा येथे आयोजित केलेल्या श्री सप्तशृंगी सार्वजनिक दुर्गा महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी ॲड मुक्ताई पवार यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी बाहेर गावातून मंडळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि गावातील ही महिला पुरुष मंडळी व बालक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदरच्या व्याख्यानाला अतिशय शांततेचे सहकार्य गावकऱ्याचे मिळाले दुर्गा महोत्सवाच्या निमित्ताने सर्व घुंगराळा नगरी लखलखाट सजली यावेळी प्रख्यात व्याख्यात्या ॲड मुक्ताई पवार यांच्या व्याख्यानाने गावातील रसिकजन दंग झाल्याचे दिसून आले आहे

0 Comments