नायगाव फास्ट न्यूज नेटवर्क :- पुणे -
बिबवेवाडी :- ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो खंडणी मागणी खंडणी वसुल करणे हा सर्रास व्यवसाय झाला असल्याने शासकीय कार्यालयातील अधिकारी असो कीं कर्मचारी अथवा गुत्तेदार असो यांना यांच्या कडे खंडणी मागितल्या जाते परंतु चक्क पुण्यातील माजी आमदार माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयात फोन करून खंडणी बहादूरपुऱ्यानी खंडणी मागितली असल्यामुळे त्या सराईत गुन्हेगारास बिबवेवाडी पोलिसांनी तेलंगणा राज्यातून जेरबंद केले आहे
सदरची कारवाई बिबेवाडी पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, पोलीस अमंलदार श्याम लोहोमकर, सतीश मोरे, तानाजी सागर यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर करत आहेत.
पुणे जिल्हा हा राज्यात प्रसिद्ध आहें पुण्यातील माजी नगरसेवक बाबा उर्फ दिपक मिसाळ यांना फोन करून तसेच मेसेजद्वारे पैशांची मागणी करणारा व पैसे नाही दिले तर जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी तेलंगणा येथून अटक केली सदरची कारवाई बिबेवाडी पोलिसांनी केली असून इम्रान समीर शेख राहणार घोरपडीगाव पुणे असे जेरबंद केलेल्या खंडणी बहादूरपुऱ्याचे नाव असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती

0 Comments