Header Ads Widget

शिराढोण येथे दिनांक २५ ऑक्टोबर रोजी होणार ज्ञानाची दिवाळी "स्पर्धा परीक्षांची तयारी व प्रशासकीय सेवेतील संधी." लाभणार !!


शिराढोण : शिवकांत पाटील डांगे  :- 

गेल्या दोन वर्षापासून शिराढोण ता. कंधार येथे गावातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी करावे या उद्धात ध्येयाने प्रेरित होऊन १५ नोव्हेंबर २०२० रोजी ग्रंथालयाची स्थापन करून स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सुसज्य ग्रंथालय अभ्यासिका निर्माण केले आहे.या ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेची सर्व स्तरावरील भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत.अभ्यासासाठी शांत व सर्व सुखसुविधायुक्त अभ्यासिका उपलब्ध करण्यात आली आहे
यात कोरोनाच्या कठीण काळात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे,मुंबई,दिल्ली,नांदेड या शहराची दरवाजे बंद झाली होती,पण आपल्या जन्मभूमीतील ग्रंथालय त्यांच्यासाठी खुलेच होते.त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासिकेचा व ग्रंथालयाचा खूप फायदा झाला. आजही गावातील व परिसरातील गरीब कष्टकरी कामगार शेतमजूर शेतकऱ्यांची मुले अभ्यास करत आहेत.स्पर्धा परीक्षेत अनेक विद्यार्थी तयारी करून यशस्वी पण होत आहेत.म्हणून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी यावर्षी नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र जिल्हाधिकारी माननीय योगेश पाटील बावणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार असून त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे

"स्पर्धा परीक्षांची तयारी व प्रशासकीय सेवेतील संधी."

शिराढोण व परिसरातील युवकांनी ह्या तिसऱ्या वर्षात पदार्पण केलेल्या या ज्ञान उत्सवात सहभागी होऊन दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ वार मंगळवारी सकाळी ठीक ११.०० वाजता कर्मचारी सेवा संघ ग्रंथालयात उपस्थित राहून ह्या ज्ञानाच्या उत्सवाचे आपणही साक्षीदार व्हावे ही आपल्याला समस्त कर्मचारी सेवा संघाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे 
या निमित्ताने त्यांच्या शुभ हस्ते गावातील सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व नवीन लागलेले कर्मचारी,पदोन्नत कर्मचारी व विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार याही कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यापूर्वी तहसीलदार मनीषा कदम मॅडम व उपजिल्हाधिकारी वशीमा शेख मॅडम यांचेही मोलाचे मार्गदर्शन गावातील व परिसरातील विद्यार्थ्यांना लाभले.गेल्या वर्षी माझी सनदी अधिकारी माननीय अनिल मोरे  यांचेही मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले  दरवर्षी दीपावली निमित्त बाहेरगावी व देशाच्या कानाकोपऱ्यात नोकरी निमित्त राहणारे गावातील कर्मचारी बांधव आपल्या जन्मभूमी येतात व वेळातला वेळ काढून कार्यक्रमासाठी आवर्जून आपली हजेरी लावतात.आपले मोलाचे योगदान देऊन येथून नवीन ऊर्जा व प्रेरणा घेऊन जाणार आहे 



Post a Comment

0 Comments