विशेष नायगाव प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे -
नांदेड जिल्ह्यातील व्यावसायिकांनी ग्रामीण भागात आपले उद्योग व्यवसाय उभे करून ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी साठी कंठेवाड बंधू व विसवा ग्रुप ने केलेल्या धाडसा प्रमाणे पाऊल उचलून एक आदर्श निर्माण करावा.व ग्रामीण भागातील जनतेला शहराच्या वस्तीत मिळणाऱ्या भोजनाच्या व निवासाच्या सुविधा उपलब्ध करून देण्या साठी पुढाकार घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,आ.अशोक चव्हाण यांनी केले.
ते पुढे म्हणाले कुष्णुर या पंचताराकींत एम आय डी सी मध्ये कंठेवाड बंधूनी जो रिसोर्ट तयार करून डोंगराच्या पायथ्याला,झाडी व तलावाच्या माथ्याला,सुंदर हॉटील निर्माण करून नांदेड हैद्राबाद महामार्गावरील ग्राहकांना समद ओके करून दिले ते प्रशंसनीय व वाखाणण्याजोगी बाब आहे.कंठेवाड हे एम. एस. इ. बी. मध्ये गुतेदारी व उद्योग करताना या नवीन व्यवसायात उतरून ते ही कुष्णुर सारख्या ग्रामीण भागात ही समाधान रिसोर्ट ची निर्मिती करून एक शहर व ग्रामीण भागाचे नाते मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे कंठेवाड यांची कार्य कृतत्वाची नांदी आहे असे आ.अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १ वा.नांदेड हैद्राबाद महामार्गावर कुष्णुर एम आय डी.सी.मध्ये उभारलेल्या समाधान रिसॉर्टचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्या प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते.या वेळी आ.अमर राजूरकर,माजी पालक मंत्री डी पी सावन्त,माजी आ.वसंत चव्हाण माजी आ.ठकरवाड,माजी सभापती संजय आपा बेळगे बालाजी शिंदे केशव घोणशे पाटील,बबन बारसे,
गोविंद नागेलीकर,ऍड कणकदंडे, किशोर स्वामी,आनंद चव्हाण माधव पावडे अमित तेहरा संतोष पांडागळे दिलीपराव धर्माधिकारी भास्कर भीलवंडे आदींची उपस्थिती व्यासपीठावर होती कार्यक्रम पत्रीकेतील भाजप खासदार व आमदार यांनी कार्यक्रमाला उपस्थित
राहिल्यांने भाजपच्या पदाधिकार्याने पाठ फिरवल्याची उपस्थित जनतेत कुजबुज ऐकायला मिळाली
या वेळी बांधकाम आर्टिकेट आनंद सर,व मिस्त्री कामगार व कलाकार रामेशवर भालेराव उर्फ ज्यू जॉनी लिव्हर सतीश कासेवार यांचा अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विसावा ग्रुपचे बालाजी इबीतदार यांनी केले तर आभार नांदेड मनपा च्या माजी नगरसेविका सविता मारोतराव कंठेवाड यांनी केले.कार्यक्रम यशस्विते साठी मारोती कंठेवाड,सविता कंठेवाड,बालाजी कंठेवाड,पंढरीनाथ कंठेवाड,विसावा ग्रुप चे बालाजी इबीतदार,गजानन मुधोळ पाटील , कंठेवाड परिवार व कैलास तेलंग, विसावा ग्रुपने परिश्रम घेतले पपुलवाड यांनी संचलन केले.या वेळी परिसरातील प्रतिष्टीत नागरिक राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments