माधव पवार
नायगाव तालुक्यातील आंतरगाव ते सावरखेड रस्त्यावर असलेल्या एका शेतात हरणाच्या कळपातील एक पिल्लू कुत्र्याच्या तावडीत सापडले होते काही सुज्ञान कार्यकर्त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून हरणाच्या पिल्याचे प्राण वाचविले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे सदरच्या पिल्याला सावरखेडच्या एका कार्यकर्त्याकडे सदरचे हरणाचे जखमी पिल्लू सुपूर्त करण्यात आले हरणाच्या पिल्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घेऊन जाऊन सुरक्षित ठिकाणी सोडण्यात यावेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याना अनेक वेळा हरणाचा बंदोबस्त करण्यासाठी मागण्या करण्यात आल्या आहेत परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्याचे दुर्लक्ष झाले असल्यामुळे हरणाचे अनेक कळप ग्रामीण भागात भटकंती करताना दिसत आहेत या कळपातील एका छोट्या हरणाच्या पिल्यावर अनेक कुत्र्यांचा हल्ला होताना दिसून आले असताना काही कार्यकर्त्यांनी रस्त्यानी जाताना पाहिले आणि कुत्र्याच्या तावडीतून पिल्ल्या सुटका केली सदरची बाब सावरखेड व आंतरगाव रस्त्यावर असलेल्या शेतात घडली आहे
सदरच्या हरणाचे पिल्लू सध्या सुरक्षित असून त्या पिल्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या बचासाठी दुसऱ्या जंगलात सोडावे अशी मागणी करण्यात येत असून दिनांक १५ ऑक्टोंबर २०२२ रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान सावरखेड ते अंतरगाव रस्त्यावर सदरची घटना घडली हरणाच्या पिल्याला सुज्ञान कार्यकर्त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून सोडून घेतले वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यानी जास्तीचे लक्ष घालून हरणाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत असली तरी कुत्र्याच्या तावडीत सापडलेल्या हरणाच्या पिल्याचे सुज्ञान कार्यकर्त्यांनी प्राण वाचविले आहे


0 Comments