Header Ads Widget

माहूर येथील पत्रकारावर गुन्हा दाखल केलेला मागे घ्या नागोराव शिंदे


हिमायतनगर नागोराव शिंदे  :- 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात पत्रकारांना भारतीय राज्यघटनेचा चौथा स्तंभ म्हणून स्थान दिले अशा ह्या पत्रकारावर माहूर येथे खोटा गुन्हा दाखल करण्याची घटना समोर आली असल्यामुळे सदरच्या पत्रकारावरील खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा म्हणून निवेदन देऊन मागणी केली आहे 
माहूर येथील पत्रकार कादर दोसांनी यांनी ग्रामीण रुग्णालयाची बातमी छापली म्हणून त्यांच्यावर राग करून तेथील डॉक्टर निरंजन केशवे यांनी खंडणी मागितल्याची खोटी तक्रार माहुर  पोलीस स्टेशनमध्ये दिली त्या तक्रारीवरून कोणताही पुरावा नसताना सदर पत्रकाराच्या विरोधात कलम ३८५ नुसार शनिवारी दिनांक आठ दहा दोन हजार बावीस रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर डॉक्टरला पत्रकारांनी कुठलाही फोन केला नाही प्रत्यक्ष भेट नाही किंवा कुठलाही सीसीटीव्ही फुटेज नाही असे असताना सुद्धा केवळ राजकीय दबाव तंत्राचा वापर करून कादार दोसांनी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे कादर दोसांनी यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे त्या अनुषंगाने आज दिनांक  १३ ऑक्टोबर २०२२ रोजी हिमायतनगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या
 माहूर येथील पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे 
त्या घटनेचा निषेध व्यक्त करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  तहसीलदार हिमायतनगर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले यावेळी निवासी तहसीलदार अणिल तामसकर यांना  निवेदन देताना महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष नागोराव शिंदे पळसपुरकर हिमायतनगर तालुका उपाध्यक्ष परमेश्वर सूर्यवंशी तालुका अध्यक्ष गंगाधर गायकवाड हिमायतनगर तालुका संघटक विजय वाठोरे  आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments