Header Ads Widget

पळसपुर येथे शासनाकडून आलेल्या दिवाळी आनंदाचा शिधा वाटप सुरू झाल्याने शिधापत्रिकाधारकांमध्ये समाधान


हिमायतनगर . नागोराव शिंदे पळसपुरकर 

आख्या भारतामध्ये अवकाळी पाण्याने थैमान घातले असून त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनातर्फे आनंदाचा शिधा म्हणून दिवाळीनिमित्त सर्व शिधापत्रिकाधारकांना साखर तेल रवा दाळअशी एक किट तयार करून  देण्यात आले आहे 

हिमायतनगर तहसीलचे तहसीलदार डी एन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मोजे पळसपुर येथील स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकाधारकांना किट  देऊन महाराष्ट्र शासनातर्फे वाटप करण्यात आले आहे यावेळी पळसपुर येथील स्वस्त धान्य दुकानदार मारोतराव सूर्यवंशी यांनी आज दिवाळीच्या मूळ शुभमुहूर्तावर सकाळी गावातून एक एक आलो सिंग करून सर्वांना आज कीडचे वाटप केले आहे

यावेळी  शिधापत्रिकाधारक मारोती जाधव ,माधव देवसरकर ,विठ्ठल राव वानखेडे ,अवधूत देवसरकर, आनंदराव देवसरकर, लक्ष्मण वानखेडे, नागोराव शिंदे नांदेड जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष यांच्यासह शिधापत्रिकाधारक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments