Header Ads Widget

परभणी जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचारी बालकिसन मोहन बरकुंडे यांचे अपघाती निधन 🌷

पूर्ण प्रतिनिधी : सय्यद कलीम :- 

पूर्णा शहरातील शास्त्रीनगर परिसरामध्ये राहणारे
परभणी जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ रोजी अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत अधिक माहिती अशी की परभणी जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचारी बालकिसन मोहन बरकुंडे हे दिनांक ३ ऑक्टोबर रोज सोमवारी कर्तव्यावर जाऊन घराकडे आले होते

परंतु दुपारच्या दरम्यान ते पूर्ण शहरातील रमाई नगर परिसरात मित्राच्या घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे ते बांधकाम पाहण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर गेले असताना घटनास्थळी त्यांचा पाय घसरून ते डोक्यावर पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले
शहरात राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनी शहरातील डॉक्टर वाघमारे यांच्या दवाखान्यामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केले होते परंतु परिस्थिती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नांदेडला हलविण्याचा सल्ला दिला नांदेड येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबर पहाटे चार वाजता त्यांचा उपचारा:दरम्यान मृत्यू झाला आहें

मंगळवारी सायंकाळी पूर्ण येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आली त्यांच्या पक्षात पत्नी दोन भाऊ बहीण दोन मुली असा परिवार आहे दरम्यान अंत्यसंस्काराच्या वेळी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने त्यांनामानाची मानवंदना देण्यात आली

Post a Comment

0 Comments