Header Ads Widget

         माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली येथील वक्फ संस्था मस्जिद-ए-कला टोंब नवाब सरफराज खॉन शहिद मखबरा झुंजागंन नकारखाना कब्रस्तानच्या सर्वे क्रं.५७७,५८० ची विरासत संबंधी प्रकरण सध्या येथील उपविभागिय कार्यालयात प्रलंबित आहे सदरिल दर्गाचे तात्पुरते मुतवल्ली मिर्झा शौकतबेग व मस्जिदचे मुतवल्ली यांची फाईल रद्द करुन प्रशासकाची नियुक्ती करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे उपविभागिय अधिकारी बिलोली यांच्याकडे करण्यात आली आहें 
बिलोली येथील निजामकालीन मस्जिद व दर्गा याची देखरेख,साफ सफाई,स्वच्छता,दिवाबत्ती,पिण्याचे शुध्द पाण्यासह नमाजचे पठण,अरबी खायदा पठण,मोज्जन व पेशमाम यांची पगार,त्यांची नियुक्ती येथील कमिटी व मुसल्लीयान हे करत आहे.त्यामुळे नमाज पडण्यासाठी येणाऱ्या नागरीकांची,मुसल्लीयान यांची अत्यंत गैरसोय होत असल्यामुळे सदरील ठिकाणी यावर प्रशासकाची नेमणुक करण्यात यावे अशी मागणी केली जात असून सदरील या ठिकाणी सर्व सोयी सुविधा नागरिक,श्रध्दालू व मुसल्लीयान यांना उपलब्ध होतील मिळतील नांदेड ते हैद्राबाद हायवे रोड लगत आहें
वक्फ मंडळ औरंगाबाद यांच्या मालकीच्या असलेल्या ईनामी खिदमत मास जागेत वक्फ मंडळाची कोणती ही पूर्व परवानगी न घेता बेकायदेशिर रित्या भुखंड माफीयाना हाताशी धरुन या ईनामी जागेवर अनाधिकृतपणे अतिक्रमन करुन टिन शेडचे दुकाने भाडे तत्वावर देण्यात आले असल्याचे सांगण्यात येते 
यासोबत शौकत फक्शंन हॉल थाटुन प्रशासनाची फसवणूक केलेली आहे.मस्जिद व दर्गाचे शौकत बेग अजिज बेग व ईतर बोगस व व्यक्ती हे आम्हीच खरे मुतवल्ली आहोत असे आता पर्यंत सांगत आले आहे पण एकाची हि विरासत मंजूर झाली नाही असे सांगण्यात येते 

त्या लोकांनी  तात्पुरत्या केल्या असल्याचे सांगण्यात येते मुत वल्लींनी गेल्या अनेक वर्षापासून कागदी घोडे नाचवून सदरील विरासतच्या फाईल मध्ये खोटे व दिशाभुल करणारे दस्ता ऐवज,कागदपत्रे देऊन प्रशासनाची दिशाभूल करीत वेळ वाया घालत आहे
यामुळेच तर सदरिल ईनामी देवस्थानच्या वादग्रस्त जागेवर दहा वर्षा पूर्वी  बिलोलीच्या तत्कालीन तहसिलदारांनी प्रशासक नेमण्याची देगलूरचे तत्कालीन उपविभागिय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता अद्याप ही कोणती ही कारवाई झालेली नाही.प्रशासनाने मा.कर्नाटक न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अवलोकन करुन येथील ईनामी खिदमते मासच्या जागेवर लवकरात लवकर प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी अशी प्रमुख मागणी एजाज फारुखी,अब्दुल रशिद, मुजफरोद्दीन रफिक ईनामदार,म.खय्युम पटेल शेख गौस मुस्तफा आदिंनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments