राज्या चे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना
अखेर जामीन मंजूर करण्यात आला असून उच्चा न्यायालयाचे न्यायमूर्ती एन जे जमादार यांनी देशमुख यांचा जामीन अर्ज मंजूर केला मात्र त्यांच्या सुटके बाबत प्रश्न चिन्ह असल्यामुळे ईडीकडून दाखल गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे परंतु सीबीआय कडून त्यांची अद्याप सुटका झाली नसल्याचे कळते १०० कोटींच्या वसुलीचा आरोप असलेल्या देशमुख यांना ईडीने अटक केली होती जवळ पास ११ महिने अनिल देशमुखाना तुरुंगात काढावे लागले असून त्यांच्या जामिनावर बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असून ते नोव्हेंबर २०२१ पासून तुरुंगात होते अनिल देशमुखां विरोधात आरोप काय ? अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी रुपयाची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता परमबीर सिंह यांनी पत्रातून हे आरोप केले होते या प्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय यांच्याकडे चौकशीचे आदेश दिले होते सीबीआयने गुन्हा दाखल केल्या नंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाई केली आहे
अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप ही करण्यात आला होता ईडीच्या आरोपां नुसार सचिन वाझेने मुंबईतील ऑर्केस्ट्रा बार मालकां कडून ४.७ कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला सदर पैसे सोपवले हवालाद्वारे हे पैसे दिली स्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते ते दोघे ही बनावट कंपन्या चालवत होते जैन यांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप ईडीने केला आहे

0 Comments