कै. शंकरराव अमृतराव चव्हाण नायगावकर यांच्या आठव्या पुण्यस्मरणार्थ गुरुवारी( दि २७) सकाळी शेतातील समाधीस्थळ येथे पुष्पांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी चव्हाण परिवारासह अनेक मान्यवरांनी समाधी स्थळी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.कै. शंकरराव अमृतराव पाटील चव्हाण हे नांदेड मनपा चे माजी उपमहापौर आनंद चव्हाण, व नायगाव नगर पंचायत चे उपनगराध्यक्ष विजय चव्हाण यांचे वडील होते
नायगाव बाजार समितीचे माजी सभापती शंकरराव अमृतराव चव्हाण यांच्या निधनाला काल आठ वर्षे झाली शंकरराव चव्हाण नायगावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक उपक्रम घेतले यात श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित नायगाव येथील आज श्री स्वामी समर्थ केंद्र नायगाव येथे उपनगराध्यक्ष विजय शंकरराव पाटील चव्हाण यांच्यावतीने विराज विजय पाटील चव्हाण यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या फोटो साठी ७१ हजार रुपयाची देणगी देण्यात आली यावेळी गुरुपीठ प्रतीनिधी श्री बोरगावकर व सर्व सेवेकरी उपस्थित होते
दि २७ रोजी सकाळी चव्हाण परिवाराच्या शेतात असलेल्या कै. शंकरराव चव्हाण नायगावकर यांच्या समाधीस्थळी पुष्पांजलीचा कार्यक्रमआयोजित करण्यात आला होता. यावेळी चव्हाण परिवारातील केशवराव चव्हाण, माजी.आ. वसंतराव चव्हाण, हनमंतराव चव्हाण,आनंदराव चव्हाण सुधाकर चव्हाण ,श्रीनिवास चव्हाण,धनंजय चव्हाण ,विजय चव्हाण श्रीधर चव्हाण डॉ. विश्वास चव्हाण, डॉ.अमरजीत चव्हाण प्रा.रवींद्र चव्हाण, श्रीधर चव्हाण, पंकज चव्हाण, गजानन चव्हाण, उपस्थित होते
श्रीकांत चव्हाण, विराज पा. चव्हाण, यांनी शंकरराव चव्हाण यांच्या समाधीचे विधिवत पूजन केल्यानंतर मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अदरांजली वाहिली.यानंतर सर्वासाठी सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी माधवराव अप्पा बेळगे, बापुराव जांभळे, संजय आप्पा बेळगे (माजी सभापती जिल्हा परिषद नांदेड),,शिवाजी पाटील पाचपिपळीकर (तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी बिलोली), दिलीप पांढरे,पंडित पाटील कल्याण खैरगावकर, म ,शरद भालेराव, रमेश पा.शिंदे, पंढरी भालेराव, संजय चव्हाण, पांडू चव्हाण,माणिक चव्हाण, विठ्ठल बेळगे, साईनाथ चनांवर ,शंकर चव्हाण, नवनाथ जाधव, गोविंदराज आंबटवार, यशवंत शिंदे ,नायगाव नगरपंचायत अध्यक्ष, प्रतिनिधी नारायण पा.जाधव, व सर्व नगरसेवक कर्मचारी बांधव ,व्यापारी, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते,पत्रकार आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

0 Comments