भोकर प्रतिनिधी : विजयकुमार पाटील मोरे
भोकर तालुक्यातील वाकत ते बाचोटी जाणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या एका वर्षापासून करण्यात येत असली तरी सदरच्या रस्त्याची बाराबाट झाले सदरचा रस्ता हा पंतप्रधान सडक योजने अंतर्गत करण्यात येत असल्याने ह्या कामावर गुत्तेदारांच्या मर्जी प्रमाणे काम होताना दिसत असून या विभागाची प्रशासकीय यंत्रणा सध्याच्या परिस्थितीत कुछ कामे ठरल्याचे दिसत आहेत
सदरच्या रस्त्यावर काम चालू असले तरी सदरील कामाची व गुत्तेदाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा संग्राम दगडू वाघमारे बाचोटीकर यांनी एका निवेदनाद्वारे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदन देऊन कळविले आहे
तालुक्यातील वाकत ते बाचोटी जाणाऱ्या रस्त्यावर गुत्तेदाराने साधी गिट्टी अंथरून ठेवली असल्यामुळे वहान धारकाला तर सोडाच परंतु जनसामान्य माणसाला या रस्त्यावरून चालने मुश्किल झाले असल्याचे दिसून येत असून या विभागाची प्रशासकीय यंत्रणा झोपेचे सोंग घेऊन गप्प बसली की काय असा प्रश्न जनतेत निर्माण झाला असून त्याच बरोबर रस्त्याची दबई न करता जेसीबीच्या साह्याने परत एकदा रस्ता खोदून ठेवला असल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे
वाकद ते बचोटी या रस्त्यावर दुचाकी चालकाला जीव मुठीत धरून या रस्त्यावर प्रवास करावे लागत असताना दिसून येत असताना सुद्धा गुत्तेदार आणि प्रशासकीय यंत्रणा जल्द गतीने काम करण्यासाठी तयार नसल्यामुळे सदरची यंत्रणा ही एकाच माळीचे मनी असल्याचे सदरील जनतेतून बोलल्या जात असून या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या जनसामान्य माणसाचा आवाज दाबला जात असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना ऐकावयास मिळत असून सदरचे तात्काळ पूर्ण करण्यात यावे अन्यथा उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे

0 Comments