माधव पवार
नांदेड पोलीस दला तर्फे वाहतूक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहणाची कागद पत्र तपासणी १८ ऑक्टोबर जारी - पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची माहिती -
नांदेड शहरातील सर्व प्रवासी वाहन धारकांना सूचित करण्यात येते की नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोजी पासून सर्व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहणाची कागद पत्र तपासणी मोहीम प्रभावी पणे राबविण्यात येत आहे
नांदेड पोलीस दला तर्फे वाहतूक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहणाची कागद पत्र तपासणी १८ ऑक्टोबर जारी - पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी नायगाव फास्ट न्यूजला माहिती दिली आहे
शहरातील सर्व प्रवासी वाहन धारकांनी आपआपल्या वाहनाचे सर्व कागदपत्रे व वाहन चालविण्याचा परवाना अद्यावत करून सोबत वाहन धारकांकडे ठेवण्यात यावे ज्या वाहन धारकाकडे कागद पत्र दिसून येणार नाहीत अशा वाहन धारकाच्या विरोधात मोटार वाहन कायद्या प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड पोलीस दला तर्फे आवाहन करण्यात येत आहे

0 Comments