माधव पवार
राज्यातच नव्हे तर राज्याच्या बाहेर राज्यात गुटख्याची निर्मिती मोठया प्रमाणात केली जाते सदरच्या गुटखा निर्मितीच्या माध्यमातून जास्तीचे उत्पन्न मिळावे म्हणून बाहेर राज्यातुन धनदांडगे व्यापारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासह राजकीय पुढाऱ्याच्या आशिर्वादामुळे तगडे व्यापारी कोठ्यावधी रुपयाचा गुटखा गोदाम असो की मोठाले दुकानें असो यांच्यात साठवण करून ठेवतात परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासह पोलीस अधिकाऱ्याची रेंज तिथं पर्यंत जात नाही का ? हा जनतेनी केलेला दमदार प्रश्न आहे
शहरी भाग असो ग्रामीण भाग असो या ग्रामीण भागातील मोठं मोठाले व्यापारी धनदांडग्या व्यापाऱ्या कडून लाखो रुपयाचा गुटखा विक्री करण्यासाठी आणतात आणि किरकोळ गुटखा विक्रीतेला विक्री करीत असतात परंतु ग्रामीण खबऱ्याच्या माध्यमातून साठवण करून ठेवलेल्या ठिकाणच्या गुटख्याची माहिती दिली जाते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस अधिकारी वरिष्ठाच्या आदेशानुसार गुटखा विक्री करणाऱ्यावर छापे मारले जात आहे
राज्यात बंदी असलेला पण परराज्यात उत्पादीत होणारा गुटखा, सुंगधी तंबाखू आदी पदार्थ पोलिस पकडतात. तरीही शहरासह जिल्ह्यातील पान टपऱ्यांवर हाच गुटखा अगदी सहजतेने उपलब्ध होतो. पोलिसांच्या हाती लागणारा गुटखा सापडतो. तो विकणाऱ्यांवर कारवाईपण होते, मात्र त्याची विक्री तरीही थांबत नाही, असेच चित्र गेल्या अनेक वर्षांपासून दिसत आहे.
सदरच्या गुटख्यासह आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात गजाआड केले जात असल्याच्या अनेक कारवाह्या होताना दिसून येत असून धनदांडगा गुटखा किंग पोलीसाच्या कारवाई पासून सई सलामत असतो आणि पोलीसाच्या छापे मारीत किरकोळ गुटखा विक्री करणारा अडकत असल्याचे वास्तव चित्र दिसून येते आहे
कोठ्यावधी रुपयाचा गुटखा बाहेर राज्यातुन आणणाऱ्या व्यापाऱ्याच्या मुसक्या आवळले तर किरकोळ गुटखा विक्रीते सदरच्या कारवाई पासून अलिप्त कारण सदरच्या छोट्या गुटखा किंगला गुटखा मिळणार नाही कारवाई होत नाही अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्या झोपेचे सोंग घेऊन अधिकाऱ्याच्या तोऱ्यात राहतात आणि पोलीस अधिकारी छापे मारून गुटखा विक्री करणाऱ्याला जेरबंद करतात हे मात्र स्पष्ट चित्र दिसून येत आहे

0 Comments