हिमायतनगर : नागोराव शिंदे -
माध्यमिक आश्रम शाळा एकघरी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथील विध्यार्थ्यांच्या तोंडी सांगण्यावरून मराठा साम्राज्य संघ तालुका अध्यक्ष हिमायतनगर या अनुसंगाने माहितीच्या अधिकारा खाली मिळालेल्या माहिती वरून खालील बाबींची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी एकघरी आश्रम शाळेची चौकशी करून योग्य ती कारवाई करा मा. प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकाऱ्याना मराठा साम्राज्य संघटनेच्या तालुकाध्यक्षानी तक्रार दिली आहें
तालुक्यातील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा एकघरी येथील शैक्षणिक गुणवता ढसाळलेली आहे सुधारणा करण्यासाठी चौकशी करण्यात यावी आश्रम शाळेत जनरेटर आणि सोलर हिटरची व्यवस्था करण्यात यावी सी सी टीव्ही कॅमेरे शाळेत व वसतिगृह येथे बसविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहें
शाळेच्या मुख्य गेटवर येणाऱ्या जाणाऱ्या पालक व कर्मच्याऱ्याची नोंद ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी दर महिन्याला पालक व अधिकारी आणि शाळाव्यवस्था पण स्थानिक समितीच्या कार्याचा आढावा घेण्यात यावा शाळा चालू झाल्या पासून विध्यार्थ्यांना आता पर्यंत दोन वेळेस मटण देण्यात आले आहे.
शाळेतील विध्यार्थीना केळी दिनांक २४ ऑगस्ट २०२२ व अंडी २७ ऑगस्ट २०२२ पासून देण्यात आली या पूर्वी का देण्यात आली नाही काही शिक्षक नांदेड येथून अपडाऊन करीत असल्यामुळे शाळेत वेळेवर लेट लथीफ येतात अशा शिक्षका मुळे काही दहावीच्या विध्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही ? तर खालच्या वर्गाच्या काय अवस्था असेल पुढील विध्यार्थ्यांच्या भविष्याचे काय होणार असा प्रश्न केला जात असून काही शिक्षक रजेवर जाऊन ही पुन्हा येऊन सह्या करतात या बाबतीत ही चौकशी करावी असे निवेदन कर्त्यांचे म्हणे आहें

0 Comments