बरबडा :-किरण हणमंते -
बरबडा येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि जवाहरलाल नेहरू मा व उच्च मा विद्यालय व जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा इत्यादी ठिकाणी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बरबडा नगरीचे विद्यमान सरपंच माधव कोलगाणे यांच्या हस्ते डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालुन त्यांना वंदन करण्यात आले. त्याठिकाणी ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन शाळेचे उपमुख्याध्यापक बडूरे जी.पी.प्रमुख वक्ते प्रा.सुदर्शन धर्माधिकारी, प्रा. तगडपल्लेवार ,पर्यवेक्षक सूर्यकांत फड ,ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक प्रा शिंदे, प्रा. शिवाजी हंबर्डे, एन. टी. तिप्पलवाड आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अनेक विद्यार्थ्याने उत्कृष्ट असे भाषण केले आहे. त्यावेळेस त्यांना बक्षीस वाटप करण्यात आले आहे. या भाषणात अनेक मुला मुलींनी भाग घेतला होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण, विद्या हणमंते, पवार तर आभार प्रदर्शन अशोक बकेवाड यांनी केले.
जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक व कन्या शाळा बरबडा यांनी पण भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. याठिकाणी केंद्रिय मुख्यध्यापक साहेब गुंटे व कन्या शाळेचे मुख्याध्यापक खंदारे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षिका आणि अंगणवाडी कार्यकर्त्या यांची उपस्थिती होती. यावेळी अनेक मुला - मुलींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर हात धुवा कार्यक्रम घेण्यात आला.

0 Comments