Header Ads Widget

नांदेडचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून श्रीकृष्णा कोकाटे तर तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची बदली



 
       माधव पवार 
नांदेडचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून श्रीकृष्णा कोकाटे तर तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची बदली करण्यात आली ग्रहविभागाने पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नाशिकचे पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी सन २००४ तुकडीचे पोलिस अधिकारी होते त्यांनी पोलिस महासंचालक कार्यालय लातूर वसई  पुणे गोंदिया येथे चांगल्या प्रकारे कामगिरी बजावली आहे. नाशिक येथे 'डॅशिंग' अधिकारी म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे
पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी केल्याचे दिसून येत असून नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची बदली झाल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्यासाठी नूतन पोलीस अधीक्षक म्हणून श्रीकृष्ण कोकाटे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून जिल्ह्याचा कारभार सांभाळणार  आहेत सदरचे आदेश २० ऑक्टोंबर २०२२ रोजी निर्गमित झाल्यामुळे मुंबई येथील पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांची नांदेड येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे
नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या बदलीच्या ठिकाणाचे आदेश सदर पुरी निर्गमित करण्यात आले नसल्याची चर्चा आहे

ग्रह विभागातील राज्य पोलीस सेवेत कर्तव्य बजाणाऱ्या पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची बदली झाली असली तरी त्यांची कोणत्या जिल्ह्यात बदली करण्यात आली हे अद्याप समजले नसले तरी मुंबईतील उपाय आयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांची नांदेड जिल्ह्यासाठी बदली करण्यात आली असल्यामुळे हे जिल्ह्याचे नूतन एसपी म्हणून काम पाहणार आहेत 








Post a Comment

0 Comments