Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड वाघाळा महानगरपालिका अंतर्गत रस्त्यास कै बळवंतराव चव्हाण मार्ग नाम फलकाचे अनावरण संपन्न !!

     
      माधव पवार 
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा मा. सार्वजनिक बांधकाममंत्री आणि मा.जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड वाघाळा महानगरपालिका अंतर्गत रस्त्यास कै बळवंतराव चव्हाण मार्ग नाम फलकाचे अनावरण सोहळा संपन्न झाला असून या विशेष कार्यक्रमाला विशेष मान्यवरांची उपस्थिती लाभली होती
नांदेड वाघाळा महानगरपालिका अंतर्गत रस्त्यास कै बळवंतराव चव्हाण मार्ग नामफलकाच्या अनावरण सोहळ्याच्या विशेष कार्यक्रमासाठी यावेळी माजी तथा मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर माजी मंत्री डि पी सावंत मा.आमदार अमरनाथ राजुरकर  नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान माजी आमदार तथा आमदार नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण महापौर जयश्री ताई पावडे. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा शेतकरी नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मारोतराव कवळे गुरुजी आदी यावेळी उपस्थित होते 
बरबडा जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ मीनाक्षी शिवाजीराव कागडे,गुरुजी जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर बँकेचे संचालक  बाबुराव पाटील कोंढेकर उपमहापौर अब्दुल गफार, नायगाव विधानसभा मतदार संघाचे युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण.माजी सभापती संजय बेळगे मा किशोर स्वमी.मा. विजय येवनकर उपनगराध्यक्ष,विजय पाटील चव्हाण मा.श्रीनिवास पाटील चव्हाण. नगरसेवक पंकज पाटील चव्हाण.श्रीकांत पाटील चव्हाण यांच्यासह विचार मंचावर विशेष मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments