माधव पवार
बहुजनाचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा बहुजन समाज घडावा आणि शिवरायांच्या मावळ्या प्रमाणे सर्व समाज एकत्र यावा असे प्रतिपादन नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या सप्तशृंगी दुर्गा महोत्सवाच्या कार्यक्रमात प्रख्यात व्याख्यात्या ॲड मुक्ताई पवार यांनी गावकऱ्यांना संबोधित केले आहे
महिला वर्गाने मा जिजाऊ साहेबा सारखे आपल्या पाल्यांना शिक्षण देऊन विद्यार्थ्यांची शिक्षणाची उंची वाढवावी असे सांगत त्या पुढे म्हणाल्या की शिवछत्रपती शिवाजी राजे हे बहुजनांचे राजे होते आणि बहुजन समाजातीलच लोक शिवरायांच्या फौजेत मावळे म्हणून काम केले असल्यामुळे शिवरायांना बहुजनाचे राजे म्हणतात सध्याचे राजकारण पाहिले तर ह्या राजकारणात वेगळी दिशा मिळाली आहे
शिवछत्रपती शिवरायांनी कधी जातीभेद मानला नाही तशाच पद्धतीने जाती भेदाला बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे ही मुक्ताताई पवार यांनी दुर्गा महोत्सवाच्या कार्यक्रमात आपल्या व्याख्यानातून सांगितले आहे
"ना मावळा " कोणी कोणाला ही म्हणत नाहीत परंतु राजे मात्र म्हणत असल्याची खंत ॲड मुक्ताई पवार यांनी आपल्या व्याख्यानातुन व्यक्त केली परंतु एकच माझा होऊन गेला शिवछत्रपती माझा राजा या राजाचे गुण आत्मसात करून बहुजन समाजाच्या बांधवांनी करावे असे आवाहन ही यावेळी पवार यांनी केले
धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमासाठी सर्व समाजातील बांधावानी एकत्रित येण्याची गरज असल्याचे ही प्रख्यानातुन मत व्यक्त केल्या आहेत ॲड मुक्ताई पवार यांनी घुंगराळा येथे आयोजित करण्यात आला होता सदरचे आयोजन सप्तशृंगी दुर्गा महोत्सवाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात आपल्या व्याख्यानातून हा संदेश दिला असूनत्या पुढे म्हणाल्या की
मॉ जिजाऊ साहेब माता रमाई माता भिमाई झाशीची राणी अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले अशा या वीर माते प्रमाणे महिला वर्गाने जास्तीचे शिक्षण घ्यावे व
आपल्या पाल्यांना शाळेत दररोज पाठवून ज्ञानात भर पाडावी असे ही ॲड मुक्ताताई पवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रतिपादन केल्या आहेत

0 Comments