Header Ads Widget

खासदार राहुल गांधी यांच्या मुक्कामाची बिलोली तालुक्याच्या शंकरनगर येथे जय्यत तयारी डॉ. सौ. मीनल ताई पाटील खतगावकर



       माधव पवार 
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे भारत जोडो पदयात्रा अभियानाची काँग्रेसच्या शिष्ट मंडळाकडून पाहणी. खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो पदयात्रेला देशात ७ सप्टेंबर पासून प्रारंभ झाला असून  महाराष्ट्रात सर्व प्रथम जिल्ह्यातील देगलूर येथे नोव्हेंबर मध्ये आगमन होणार आहे
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या गोदावरी मानार कारखान्यावर मुक्काम असल्याने डॉ.सौ. मीनल ताई पाटील खतगावकर व दिल्लीच्या पथकासह नांदेड जिल्ह्याचे सर्व काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पाहणी युद्ध पातळीवर जयत तयारी सुरू केली आहे
काँग्रेसचे अध्यक्ष तथा खा. राहुल गांधी यांचे नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या आगमनाच्या मुहूर्ता पूवीच काँग्रेसच्या विद्यमान नेते मंडळीच्या माध्यमातून जोरदार तयारी चालू करण्यात आली  खा. राहुल गांधी हे शंकर नगर येथे मुक्काम करणार असल्याने नांदेड जिल्ह्याचे माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी मानार कारखान्याच्या जवळ पास ४० हजार जनसमुदाय बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात येत असून सदरच्या साफ सफाई सह अन्य कामे युद्ध पातळीवर चालू करण्यात आली आहेत

खासदार राहुल गांधी हे देगलूर आटकळी ते शंकर नगर येथे मुक्काम करणार ? आहेत. दैनंदिन सकाळी ७ ते १०.३० दरम्यान १५ किलोमीटर आणि दुपारी ३ ते ६.  ३० पर्यत ८  की.मी. पदयात्रा करण्यात येणार असल्याची माहिती डॉ मीनलताई पाटील खतगावकर यांनी माहिती दिली असून अनुषंगाने खासदार राहुल गांधी यांच्या मुक्कामाच्या ठिकाण्यासह पदाधिकाऱ्यांची व्यवस्था तसेच कार्यकर्ते व या तिन्ही ठिकाणाची पाहणी मंगळवारी नांदेड जिल्ह्याच्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे 
यावेळी उपस्थित आ. अमर राजूरकर. डॉ. सौ. मीनल ताई पाटील खतगावकर. माजी जिल्हा परिषद सभापती संजय बेळगे. किशोर स्वामी. बाळासाहेब पा. खतगावकर. शिवाजी पा. पाचपळीकर. काँग्रेस तालुका अध्यक्ष संभाजी पा. भिलवंडे. दिलीप पांढरे. माधव कधारे. प्रा. पांडे  माधव वाघमारे. पत्रकार दिलीप वाघमारे पत्रकार निळकंठ पा.जाधव पत्रकार परमेश्वर पा.जाधव पत्रकार सुभाष पेरकेवार पत्रकार शेषराव कंधारे. पत्रकार सिनगारे.पत्रकार तानाजी शेळगावकर. कोकणे आदीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments