Header Ads Widget

नरंगल येथील एक अल्प भूधारक कुटुंब पतीच्या आत्महत्या नंतर तीन चिमुकल्या मुलासह पत्नीचा संसार उघड्यावर भाकरीसाठी करावा लागतो संघर्ष -

    
नायगाव : मधुकर जवळे  :- 

नरंगल येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांने नापिकी आणि कर्जाला कंटाळून शनिवारी आपली जीवनयात्रा संपविली  असल्यामुळे दिवाळीच्या तोंडावर सदरच्या कुटूंबातील एक प्रमुख व्यक्ती आत्महत्या केल्यामुळे घरातील कर्ता माणूस निघून गेल्यामुळे कुटूंबातील व्यक्तीला किती वेदना होत असावेत हा महत्वाचा प्रश्न असून सदरचे अल्पभूधारक कुटुंब हे भाकरीसाठी संघर्ष ? सुरु झाला असला असल्यामुळे घरातील पत्नीने काय कराव पत्नीसह तीन मुलीचे भविष्य काय असा प्रश्न निर्माण झाला आहे
जागतिक अन्न दिवस असून जागतिक अन्न दिवसाच्या पुर्व संध्येला भाकरीसाठी संघर्ष करण्यात अपयश आल्याने गळफास घेवून तालुक्यातील नरंगल येथील अल्पभूधारक शेतकरी कायमचे त्यांच्या कुटूंबाला सोडून गेल्यामुळे कुटूंबातील व्यक्तीवर अतिशय बिकट वेळ आली असल्याचे सांगण्यात येते

मयत प्रदीप पट्टेकर पत्नी संगीता यांचे वय (२८) वर्ष तर मुलगी प्राजक्ता (७), संस्कृती (४) आणि पुनम (२) आहे. घरात आठराविश्व दारिद्र्य, रहायलाही सुस्थितीत घर नाही मग २८ वर्षाची माऊली तीन चिमुकल्यांना घेवून जगणार कशी ? संसाराचा गाडा ओढणार कुणाच्या भरवश्यावर. ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने नरंगल येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिवाळी तोंडावर आली असल्याने पत्नीला नवीन साडी व तीनही चिमुकल्यांना कपडे मिळतील आणि दिवाळीत काही तरी गोड गोड खायाला मिळेल अशी अपेक्षा आता या कुटूंबातील पत्नी आणि मुले कोणाकडे करतील हा अतिशय महत्वाचा प्रश्न सदरच्या कुटुंबाला भेडसावत असून शासकीय व्यवस्थेच्या अनास्थेमुळे एका तरुण शेतकऱ्यांने आपली जीवन यात्रा संपवली असली तरी त्यांच्या मरणानंतर प्रश्न सुटण्या ऐवजी  अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत भाकरीसाठी संघर्ष करणाऱ्या या कुटूंबाला सक्षम करण्यासाठी प्रशासनाने लक्ष घातले पाहिजे व आधार देण्याची गरज भासत आहे.


Post a Comment

0 Comments