Header Ads Widget

पळसपुर येथे चारा खाण्याच्या नादात चाळीस हजार रुपये किंमतीची गाय विहिरीत पडून गमावला जीव पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट !!

हिमायतनगर : नागोराव शिंदे   :- 

हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील अल्पभूधारक शेतकरी दिलीप किसन वाडेकर या शेतकऱ्यांची गाय चारा खाण्याच्या नादात असताना अचानक पणे विहिरीत तोल जाऊन पडल्यामुळे विहिरीत जास्तीचे पानी असल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली मृत्यू पडलेल्या शेतकऱ्यांच्या गायीचे किंमत बाजार भावा प्रमाणे अंदाजे चाळीस ते पन्नास हजाराच्या जवळ पास असल्यामुळे शासनाने अपघाती मृत्यू म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ करावी अशी मागणी होताना दिसून येत आहे
पळसपूर येथील रहिवासी असलेले शेतकऱ्याना विहिरीत पडलेल्या गाईला विहिरीच्या बाहेर काढून घेण्याची सूचना देऊन या बाबत शेतकऱ्याच्या नुकसानीची भरपाई महसूल विभागा कडून देण्यात यावी म्हणून सदरची मागणी दिलीप वाडेकर यांनी प्रशासना कडे केली आहे

प्रशासनाने इतर बाबीतील अपघात झाल्याच्या नंतर नुकसान भरपाई विविध योजनेच्या करत असते परंतु एखांद्या जनावराचा ज्या वेळेस अपघाती मृत्यू होतो त्यावेळेस मात्र काही जाचक अटी लावून मदत करण्यासाठी दुर्लक्ष करत असते परंतु तालुक्यातील पळसपूर येथील एका अल्पभूधाक शेतकऱ्यांची चाळीस पन्नास हाजर रुपयाची गाय चारा खाण्याच्या नादात डॅम विहिरीत पडून जीव गमावला असल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे हिमायतनगरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सोनटक्के यांना माहिती दिल्या वरून ते तात्काळ घटनास्थळी येऊन सदरील घटनेची पाहणी केली आहे

Post a Comment

0 Comments