माधव पवार
राज्यातल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सन २०१८ ते २०२१ दोन ते तीन वर्षाच्या कालावधीतील जर शेतकरी थकबाकीदार असतील आणि सदरील शेतकऱ्यांकडे दोन लाखा वरील त्यांच्याकडे थकबाकी असेल तर जे शेतकरी दोन लाखा वरील असलेले पैसे भरणा करतील त्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये महात्मा जोतिबा फुले योजने अंतर्गत महाविकास आघाडी सरकारने सदरील दोन लाख रुपये सदरील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करेल असे महाविकास आघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या सभागृहात सांगितले होतेसदरची योजना मंजूर करून सभागृहाची मंजुरी घेतली होती परंतु अद्याप तरी सदरचे दोन लाखा पर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले नसल्यामुळे ते तात्काळ जमा करण्यात यावे या मागणीसाठी माजी मंत्र्याचे जावई आंबादासराव धर्माधिकाऱ्याचे राज्याच्या मुख्यमंत्र्याना थेट निवेदन देऊन कळविले आहे
सदरील दोन लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले गेले नसल्यामुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँके कडून थकबाकी दाराना चालू बाकीदार करून नवीन - जुन्ने खाते व्यवहार करण्यासाठी बँके कडून सन २०१८ ते २०२१ च्या थकबाकी शेतकऱ्यांच्या मार्फत १४ टक्के व्याज भरून चालू बाकीदार करण्यात यावे या मागणीसाठी माजी मंत्री स्वा. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे जावई बरबड्याचे चेअरमन आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे निवेदन दिले आहे
महाविकास आघाडी सरकार दोन लाख रुपया पर्यंतचे कर्ज भरणा करणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शेतकऱ्यानी कर्ज भरले नाहीत आणि त्यामुळे बँकेच्या १४ टक्के व्याजासह चालू बाकीदार धोरणामुळे शेतकऱ्यांच्या मुदत रक्कमा एवढी व्याजा सहीत दुप्पट रक्कम होत असल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याने आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन कळविले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी सदरचे निवेदन देण्यात आले आहे

0 Comments