Header Ads Widget

लोकशाहीत काळात प्रसार माध्यमाला मोठे महत्व असते पत्रकारिता हा काही प्रामुख्यानं पैसा कमावण्याचा अथवा नफा कमावण्याचा धंदा नसतो -

     माधव पवार
लोकशाहीच्या काळात प्रसार माध्यमाला फार मोठं महत्व असल्यामुळे सदरची प्रसार माध्यम टिकली पाहिजेत त्यांच्या संवर्धनासाठी निर्भेळ वातावरण असण्याची गरज असून पत्रकारिता हा काही प्रामुख्याने पैसा कमावण्याचा अथवा नफा कमावण्याचा धंदा नसल्याचे सांगण्यात येत आहे

माध्यमांचं काम सकळजनांना शहाण  करूण सोडण असलं पाहिजे माध्यमांनी समाजाला जागृत करण्याच व्रत सोडू नये अशी ही अपेक्षा जनता करता करत असते पत्रकारांनी लोकशिक्षण करत असताना समाजात नेमकं काय सुरु आहे

त्यावर तटस्थ भूमिका घेऊन भाष्य करुन दिशा देणं ही अपेक्षित असत म्हणून पत्रकारितेला व्यवसाय म्हटलं जात नाही तर त्याला पेशा अर्थात व्रत वसा म्हणून स्वीकाराव लागत असं ही सांगितलं जाते 

पत्रकारांनी प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भिडपणे सद्सत् विवेक जागृत ठेऊन ज्यांना स्वत:चा आवाज नाही त्यांचा आवाज होऊन त्यांच्या मूक आवाजाला निर्णय कर्त्यां पर्यंत बहु संख्या का पर्यंत पोहोच वण्याच काम कराव अस ही अपेक्षित असत  म्हणून पत्रकारांनी समाजाचा मूकनायक व्हाव म्हणून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वृत्तपत्राचं नावं ‘मूकनायक’ असं ठेवलं होत 

पत्रकार खरच आपलं कर्तव्य समर्थपणे जेव्हा पूर्ण करत असतो तेव्हा व्यवस्था त्यांच्या बाजुने उभी राहील, असे नाही. अनेक घटकांना सुखावताना काही घटकांची नाराजीही पत्रकारांना ओढवून घ्यावी लागते.

पत्रकारांनी लोकांना नवी दृष्टी द्यावी, लोकांना डोळस करावं. पत्रकारांनी लोकप्रिय समजुती धुडकावत आपल्या श्रद्धास्थानांची चिकित्सा तटस्थपणानं करावी. त्यामुळे पत्रकार समाजातील काही घटकांच्या हितसंबंधांना धक्के देताना दिसतात. पण असे धक्के स्वीकारण्याची ज्या समाजाची मानसिकता नसते, तो समाज विकसित होऊ शकत नाही. माध्यमाने निरपेक्ष, पूर्वग्रहदुषितपणे विषय मांडू नयेत, अशीही अपेक्षा असते.


 

Post a Comment

0 Comments