हिमायतनगर : नागोराव शिंदे -
शेतकऱ्यांसह व्यपारी आणि वाढती संख्या व खातेदाराची आडचण लक्षात घेऊन अधिक राष्ट्रीयकृत बँकाची निर्मिती करावी असे हिमायतनगर हदगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी शेतकऱ्याचे हित जोपासण्यासाठी व आर्थिक व्यवहार सुरळीत चालावा म्हणून मागणीला प्रधान्य दिले आहे
हिमायतनगर तालुक्यासह अन्य तालुक्या बरोबर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह व्यापारी आणि वाढती संख्या व खातेदाराची अडचण लक्षात घेऊन प्रशासनानी जनसामान्याच्या हितासाठी राष्ट्रीयकृत अधिक बँकानिर्मिती करण्यात यावी असे मत विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी व्यक्त केले आहे
सदरच्या राष्ट्रीयकृत बँका कमी आणि लोकसंख्याच्या प्रमाणात फार मोठी वाढ होत असल्याने व बँकेत खातेदाराची ही संख्या वाढल्यामुळे शेतकऱ्यांना व व्यापारी गटांना ठेव व उचल करण्यासाठी सदरच्या गर्दीमुळे विलंब लागत असल्यामुळे सदरचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा जनतेसह शेतकऱ्यांनी व व्यापारी गटांनी व्यक्त केली आहे
राज्यातले सरकार ही सदरची बाबीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे पीक विमा असो शासकीय अनुदान असो अथवा कर्ज परत फेड घेणे व भरणे शेतकऱ्यांना व व्यपाऱ्याना असल्यामुळे बँकेत प्रतीक्षा करावी लागते आणि पैसे खात्यातील उचलण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांसह जनसामान्य माणसाला त्रास जाणवत असल्यामुळे विद्यमान आमदारानी सदरची बाब लक्षात घेऊन त्यांच्या डोळस विचारातुन दूरदृष्टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिक निर्मितीसाठी अतिशय महत्वाची मागणी केली आहे

0 Comments