Header Ads Widget

कृष्णूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाचे माजी आ.वसंतराव पा. चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन



    बरबडा :- किरण हणमंते 
कृष्णूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाचे माजी आ.वसंतराव पा. चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे 

नायगाव तालुक्यातील मौजे कृष्णूर येथे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते नुकताच  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाच्या भूमिपूजन य सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला असून बोध बांधवासाठी भव्य असे सांस्कृतिक सहभाग घराचे काम लवकरच होणार आहे 
तालुक्यातील मौजे कुष्णुर येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी सदरील सोहळ्याच्या कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे म्हणुन पंढरीनाथ  कमठेवाड, प्रा. मनोहर पवार,  डॉ. शिवाजी कागडे, बरबड्याचे माजी सरपंच बालाजी मदेवाड, गुत्तेदार मनोज पाटील मोरे, मा. प्रा. गोविंद कागडे, कृष्णूरचे सरपंच प्रतिनिधी जाधव, व्हि. के. कागडे, रावसाहेब जाधव, परबतराव जाधव, भगवान जाधव, अशोक कागडे, शिवाजी कागडे यांच्यासह आदी उपस्थित होते

बौध्द बांधव व महिला कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कागडे यांनी तर सूत्रसंचालन राहुल ढुमणे यांनी केले तर आभार प्रदर्शन सदरच्या आयोजित व्यासपीठाने मानले आहेत


Post a Comment

0 Comments