नायगाव प्रतिनिधी मधुकर जवळे :-
इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त दि.९ आक्टोंबर २०२२ रोजी रविवारी नायगाव व नरसी शहरामध्ये भव्य मिरवणुक काढून 'जुलूस ए मोहम्मदी' मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे
प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांनी जगाला दिलेली शांती आणि मानवतेची शिकवण समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी हा यामागील उद्देश असून मुस्लिम बांधवांमध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीला विशेष महत्त्व आहे
त्यासाठी ईद मिलादुन्नबी साजरी करण्यासाठी नरसी व नायगाव शहरातील समाज बांधव आठ दिवसांपासूच तयारीला लागले होते शहरात जुलूस ए मोहम्मदीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जागोजागी शरबत व पाणी वाटप करण्यात आले
हातात झेंडे घेऊन देखाव्यासह नाते रसूलच्या स्वराने जुलूस ए मोहम्मदी मिरवणूक काढून नायगाव येथील तवक्कल शहावली तर नरसी येथील खाकी शहावली यांच्या दरगाह येथे जाऊन फातेखानी,दुवा व सलाम पढण केल्यानंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली आहे
नरसी येथील मिरवणुकीत जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगावकर, भारतीय मराठा महासंघाचे चंद्रकांत पाटील होटाळकर,काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी पा.भिलवंडे,
शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र पा.भिलवंडे,सरपंच गजानन पा.भिलवंडे,माजी सरपंच प्रतिनिधी गजानन पा.भिलवंडे, रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी मस्जिद चे इमामसाहेब यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहे
विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मारोती सुर्यवंशी आणि देविदास सुर्यवंशी व त्यांचे सहकारी जुलूस मध्ये सहभागी होऊन शेवटपर्यंत साथ दिल्याने समाजबांधवाकडून त्यांचे कौतुक होत आहे यावेळी समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

0 Comments