माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूरकर शुगर कारखान्याच्या बॉयलरचे पूजन दिनांक १० ऑक्टोबर २०२२ रोजी मान्य वरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरुन बोलताना नांदेड लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की राज्यात शिंदे व फडणीस सरकार चांगल्या प्रकारे काम करत असून या अगोदरच्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंत्री जेलमध्ये आणि त्यांचे नेते --
बाहेर कारभार करू लागले परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कार्यकाळात सरकार अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे राजेश कुंटूरकर तुम्ही चिंता करण्याची गरज नाही तुमच्या पाठीशी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत असे हे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हणाले आहे
कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार प्रताप चिखलीकर यांच्यासह व्यापीठावर राजेश देशमुख कुंटूरकर, बाळासाहेब उर्फ आंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर , भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, बालासाहेब पाटील खतगावकर, बाबासाहेब हंबर्डे हुस्सेकर रमेश पारसेवार, शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर, परबता पाटील जाधव, जाफ्रूदिन साहेब, कुंटूर पोलीस ठाण्याचे फौजदार दिनेश येवले, व्यंकटराव मोकले, दिलीप महोनराव सुगांवकर, आदी यावेळी उपस्थित होते
राजेश्वर वंगलवार,राम चिद्रावार, विक्रम देशमुख, हणमंतराव कोळगावकर, प्रल्हाद पाटील जाधव, आनंराव, मोरे, भगवानराव मनूरकर, केरबा रायेवार, गजानन पाटील जुन्ने, सूर्याजी पाटील चाडकर, रामचंद्र बोडांरे, माधवराव ढगे, माधव पाटील, भास्करराव धर्माधिकारी, भाऊसाहेब देशमुख रुई बु, प्रकाश पाटील, विजय केशेटवार, केशव कदम, रावसाहेब पाटील कुदळेकर, मारोतराव कदम कुंटूरकर, पत्रकार तानाजी शेळगावकर आदी यावेळी मान्यवर उपस्थित होते
याच कार्यक्रमात पुढे बोलताना खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षाच्या काळात नांदेड जिल्ह्याचा विकास कोणत्या ही खासदारांनी केला नाही तेवढा विकास मी पाच वर्षाच्या काळात करून दाखवित आहे ते पुढे म्हणाले की राजेशजी कारखाना चालण्यासाठी मोठी ताकत लागते असे सांगत ते पुढे म्हणाले की ह्या जिल्ह्यातील नेत्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये एक किलोमीटर सुद्धा राष्ट्रीय मार्ग केला नाही परंतु मी करून दाखवित आहे असे ही प्रताप पाटील चिखलीकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले आहे
""" बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर म्हणाले """
शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला वेळेवर गेला पाहिजे शिंदे फडणवीस सरकार राज्यात आले आहे आघाडी सरकारानीऔरंगाबादचे संभाजी नगर केले आणि उस्मानाबादचे धाराशिव केले असताना फडणवीस सरकार कडूनअन्याय का असा प्रश्न खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समोर उपस्थित केला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे असे सांगत ते बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांनी पुढे म्हणाले की ऊस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यानी प्रयत्न करावेत कुंटूरकर शुगर कारखाना चांगला चालत असल्यामुळे शेतकऱ्यानी ऊस कारखान्याला द्यावेत असे आवाहन यावेळी बरबडेकर यांनी केले आहे
""" राजेश देशमुख कुंटूरकर म्हणाले ""
दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर आणि स्वा. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या निधना नंतर नांदेड लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिकलीकर यांनी कसल्याच प्रकारची मला उणीव भासू दिली नसल्याचे राजेश देशमुख कुंटूरकर यांनी आठव्या गळीत हंगाम बॉयलरच्या पूजनाच्या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले पुढे बोलताना ते कुंटूरकर म्हणाले की शेतकऱ्यांची मला जान असून निसर्गाच्या अशा परिस्थिती मुळे सर्व --
शेतकऱ्यांसह कारखानदार ही आडचणीत सापडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे कारखान्याची स्थिती चांगली असून पाच लाख मॅट्रिक टन ऊस गाळप यंदा झाला पाहिजे हा माझा उद्देशअसून व्यापारी राजकारण शेतकरी केले तरच अनेक समस्यावर मात करता येते सद्बुद्धीने वाटचाल केले तर पदरात काही तरी पडते आणि सुडबुद्धी मनात ठेवली तर वाईट होते शेतकऱ्यांना उसाचे बेणे उधारी देण्यात येणार आहेत शेतकऱ्यानी ऊस लागवडीकडे वळावे असे राजेश देशमुख्य कुंटूरकर यांनी म्हणाले आहे

0 Comments