माधव पवार
नायगाव फास्ट न्यूज नेटवर्क - चंद्रपूर सिंदेवाही -
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नलेश्वर येथील रहिवासी असलेल्या मयत तानाबाई महादेव सावसागडे वय वर्ष ६५ असे भावजयीच्या मदतीने मुली कडून खून करण्यात आलेल्या मृत महिलेचे नाव असून यातील आरोपी मुलगी वंदना खाते वय ३५ आणि सून चंद्रकला सावसागडे वय ४० यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते सदरचा झालेला मुली कडून आईचा खून हा जमिनीत वाटा पाहिजे म्हणून पोटच्या मुलीने स्वतःच्या मातेचा भावजयीच्या मदतीने खून काटा काढला असल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहें
जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस ठाण्यात स्वतः आरोपी मुलीनेच माझी आई बेपत्ता झाल्याचे पोलिसाच्या डोळ्यात धूळफेक करीत माझ्या आईचा खून झाला असल्याची तक्रार दिली होती पोलिसांनी बारकाईने तपासाला सुरुवात केली या सदरच्या प्रकरणात सुरुवातीला संशयित म्हणून त्यांनी आरोपी मुलगी वंदना खाते आणि सून चंद्रकला सावसागडे यांना ताब्यात घेतले असता सदरील प्रकरणाचे पोलिसांच्या तपासात भिंग फुटले आणि आरोपीच स्वतःची मुलगी निघाली असल्यामुळे एकच खबळ उडाली आहे
सदरील प्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी कसून चौकशी करत होते त्यावेळी मुलगी व सूनबाई पोलीना संशयास्पद उत्तरे देऊ लागले सदरच्या आरोपी महिलाना पोलीस म्हणजे काय असते हे दाखवताच आईचा नाक व तोंड दाबून खून केल्याची कबुली दिली आहें
" चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नलेश्वर "
सदरच्या मुलीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जमिनीत गडला गेला ही घटना ३ तारखेला घडली पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मयत तानाबाई महादेव सावसागडे वय ६५ असे खून करण्यात आलेल्या मृत महिलेचे नाव असून या प्रकरणातील आरोपी मुलगी वंदना खाते (वय ३५) आणि सून चंद्रकला सावसागडे (वय ४०) यांना अटक पोलिसांनी केली अटक दिलेल्या माहिती नुसार आरोपी मुलीने तानाबाई सावसागडे यांचा मृत्यू झाल्याची माहिती मयत महिलेची थोरली मुलगी रंजना सोनवणे यांनी पोलिसांना दिली असली तरी आईचा अंत्यविधी उरकल्याने रंजना यांना संशय आला आहे

0 Comments