Header Ads Widget

बरबडा येथे झालेल्या जोरदार पाऊसाने शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाचे नुकसान

 बरबडा :- किरण हणमंते 

बरबडा परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून अचानकपणे जोरदार पाऊस पडत असल्याने हाता तोंडाशी आलेले सोयाबीनचे पिके वाया जाते का? अशी भीती शेतकऱ्यांना आहे. काही सोयाबीन काढणीला आली होती तर काहींची काढणी चालु होती. तेवढ्यात पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांची अडचणीत वाढ झाली आहे. वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन पावसाच्या तडाख्यात सापडल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे

.दोन दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शेती सर्व कामे ठप्प झाले आहे. यंदा पावसाने शेतकरांची चेष्टाच करत आहे कि काय असा प्रश्न सर्वांना पडत असल्याचे ऐकावंयास मिळत आहे. हा पाऊस अधून मधून उघड झाप करत नेमक नको त्या वेळेला जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील कापणीसाठी आलेली शेतातील सोयाबीन पिके पावसाच्या तडाख्यात सापडली असल्यामुळे शेतकरी त्या पिकांना वाचवण्यासाठी एकच धावपळ सुरू करत असताना दिसत आहे. याच सोयाबीन साठी तीन -  हजार रुपये प्रति बॅग साठी किंमत व मजुरी मोजावी लागत असून त्यामध्ये निसर्गाचा असा त्यांच्यावर कोपत राहणे हा नियतीचा खेळ आहे का अजुन काही का योगायोग असे बोलल्या जात आहे.

यामुळे सर्व बाजुने शेतकरी आर्थिक संकष्टच्या सापडला आहे. सोयाबीन जर पिकवलं बाजारात विकायला आणलं तर त्या मालाला या बाजारपेठामध्ये कवडी मोल भावात विकावे लागते.ऐन सणासुदीच्या तोंडावर व्यापारी वर्गाकडून वेठीस धरल्यासारखे झाले आहे.

जर या पावसाने आणखी काही कालावधी आपला मुक्काम ठोकला तर शेतकऱ्यांची हाता तोंडाशी आलेले पिके निश्चितच मातीमोल होऊन ती पावसामुळे पिके खराब होतील व बाजारपेठे मध्ये त्यांना कवडी मोलांचा भाव मिळेल या भीतीने शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Post a Comment

0 Comments