Header Ads Widget

काँग्रेसची धुरा खरगेंच्या खांद्यावर; अध्यक्षपद निवडणुकीत ७८९८ मते शशी थरूर यांना १०७२ मते मिळाल्यामुळे पराभव स्विकारावा लागला !!


नायगाव फास्ट न्यूज :- नेटवर्क - नवी दिल्‍ली  - 

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते यामध्ये मल्लिकार्जुन खरगे विजयी झाले तर शशी थरूर पराभूत झाले असून या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस पक्षाचे भवितव्य मत पेटीत बंद करण्यात आले होते
सदरच्या निवडणुकीमुळे काँग्रेसला २ दशकांहून ही जास्त कालावधी नंतर प्रथमच गांधी घराण्या बाहेरील अध्यक्ष मिळाला असून शशी थरूर यांना सदरच्या निवडणुकीत एकूण १०७२ मते मिळाली तर मल्लिकार्जुन खरगे यांना या निवडणुकीत एकूण ७८९८ मते मिळाल्यामुळे  विजयी उमेदवार ठरले आहे काँग्रेस पक्षाच्या १३७ वर्षाच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस पक्षाचे भवितव्य मत पेटीत बंद झाले होते
अध्यक्षपद निवडणुकीसाठी जवळपास ९६ टक्के मतदान झाले होते २४ अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात सकाळी दहा वाजे पासून मतमोजणीला सुरूवात करण्यात आली होती विधानसभा निवडणूक ही मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्यामुळे  काँग्रेसच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष लागणार असून २ वर्षाच्या नंतर देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत

खरगे यांना पक्षाची नव्याने बांधणी करावी लागणार असल्याने भाजपा विरोधात विरोधकांना एकत्र आणणे आणि मजबूत बांधनी करण्याची जबाबदारी खरगे यांच्या यांच्यावर राहणार आहे 

Post a Comment

0 Comments