Header Ads Widget

हिमायतनगर तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुनील जाधव तर उपाध्यक्षपदी बंडु जाधव यांची निवड !!

हिमायतनगर : नागोराव शिंदे  :- 

हिमायतनगर येथील पंचायत समितीच्या  वसंतराव नाईक सभागृहामध्ये ग्राम रोजगार सेवकांची एक बैठक  पार पडली या बैठकीमध्ये महाराष्ट्र रोजगार सेवक संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी सुनील जाधव तर उपाध्यक्षपदी बंडु जाधव सचिव पदी रामकिसन लकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे 
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. यामध्ये १०० दिवसांपर्यत रोजगाराची कमी केंद्र सरकारची आहे व त्यानंतरची रोजगाराची राज्य सरकार देते परंतु सध्या रोजगार हमी योजनेचे कामे नसल्यामुळे मजुरावर उपवास मारीची वेळ आली आहे 
उर्वरित कार्यकारणी खालील प्रमाणे कोषाध्यक्ष दत्ता धनवे सदस्य पदी मुजीब सर खडकी संतोष नालमवार बालाजी वाघमारे संजय वाडेकर पळसपुरकर  शेषराव पाटील टेंभीकर पंजाब चव्हाण कैलास कांबळे वासुदेव अमोल सूर्यवंशी टिकाराम कदम यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक यांच्या उपस्थितीमध्ये वरील कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे
रोजगार हमी योजनेतून महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार कसा मिळतो ? जाणून घ्या फायदे सन १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या संकटावर मात करून लोकांच्या हातांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी ही योजना आकारास आणली आहे 
रोजगार हमी योजनाची पाया भरणी वसंतराव नाईक यांनी केली, त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेचे जनक मानले जाते. रोजगार नसलेल्यांसाठी वर्षातले किमान ठरावीक दिवस रोजगाराची हमी देणारी ही योजना रोजगार हमी योजना म्हणून ओळखली जाते मात्र सदरील युवकाची या विभागावर निवड करण्यात आल्यामुळे रोजगार हमी योजनेचे कामे चालू करण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा मजूर वर्गानी व्यक्त केली आहे 

Post a Comment

0 Comments