कंधार तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा कृषी कार्यालया समोर केले अमरण उपोषण जारी करण्यात आले असून जो पर्यंत मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत सदरचे अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्याचे ठाम मत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी करण्यात येत असलेल्या उपोषणाला नक्की दाद प्रशासना कडून मिळेल अशी अपेक्षा उपोषण कर्त्यांनी व्यक्त केली आहे
नांदेड जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करुन सुद्धा पिक विमा वाटप केल्या जातं नसल्यामुळे सदरचा विमा तात्काळ नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांना दिवाळी पूर्वी २५ टक्के जास्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा मागणीसाठी कार्यकर्ते बालाजी पाटील सांगवीकर बालाजी पाटील ढोसणे अनिल पा दापकेकर नायगाव तालुक्यातील गजानन पाटील होटाळकर लोहा-कंधार येथील कार्यकर्ते अंकुश पा कोल्हे यांच्यासह अनेक कार्यकर्ते अमरण उपोषणास बसले आहेत
"मग तर शेतकऱ्यांना गांजा लावण्याची परवानगी द्यावी ?
अनेक वेळा निवेदन पाठपुरावा करुन सुद्धा पिक विमा जमा होत नाही आणि शेजारच्या जालना जिल्ह्यात शेतकर्यांच्या खात्यावर पिकविम्याची रक्कम जमा करण्यात आली असल्याचे उपोषण कर्त्यांचे म्हणे असून नांदेड जिल्ह्यात पीक विम्याची २५ टक्के रक्कम जमा झाली नसल्यामुळे ते जमा करण्याच्या मागणीसाठी अमरण उपोषण केल्या जात असून सदरची बाब जिल्हाधिकारी नांदेड यांनी लक्ष दयावेत अशी मागणी केल्या जात आहे
जास्तीची रक्कमेची अधिसुचना काढुन सुद्धा एक महिना लोटला तरी पिक विमा कंपनी अधिसुचनेचे पालन करीत नाही त्यामुळे कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी उपोषण कर्त्यांची आहे
नांदेड येथे करण्यात येत असलेल्या शेतकऱ्यांची दशाची आणि व्यथाची जान असणारे बँक कर्जासाठी शेतकऱ्यांना नेहमीचं मदत करणारे श्रीधर पाटील चव्हाण व बालाजी पाटील बेटमोगरेकर यांचा दिनांक २० ऑक्टोबर २०२२ रोजी नांदेड येथे पत्र देऊन उपोषण कर्त्यांनाना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे

0 Comments