माधव पवार
नायगाव फास्ट न्यूज -नेटवर्क मुबई :-:
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ रोजी दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. शिवतीर्थावरुन भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत भाषण करत एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्ला चढवला आहे
"”""म्हणून सर्वांसमोर नतमस्तक ”""
उद्धव ठाकरे म्हणाले, विजया दशमीच्या शुभेच्छा देत असताना गेल्या अनेक वर्षांची परंपरा आणि ते दसरा मेळावे माझ्या आजही लक्षात आहेत. पण असा मेळावा फार क्वचित झालेला आहे. मनापासून सांगतो की, मी भारावून गेलो आहे. भाषणासाठी खूप मुद्दे आहेत. पण मी खरंच किती बोलू शकेल... कारण तुमचं हे प्रेम पाहिल्यावर मुद्दे असले तरी शब्द सूचत नाहीयेत आणि हे विकत नसतं मिळत. हे ओरबाडून घेता येत नाही. ही कोरडी गर्दी नाही. ही माझ्या जिवाभावाच्या शिवसैनिकांची गर्दी आहे. म्हणून मी सर्वप्रथम आपल्या सर्वांसमोर नतमस्तक झालो आहे
"""" गद्दारच म्हणणार """
ज्यावेळी आपल्या पक्षातल्यांनी गद्दारी केली. गद्दारच म्हणणार... कारण मंत्रिपद ही तुमच्या बुडाला चिकटलेली असतील तरी ती काही काळापूरती आहेत. पण कपाळावरील गद्दारीचा शिक्का तरी या जन्मात पुसता येणार नाही. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडलेला आता शिवसेनेचं काय होणार? पण मला चिंता नव्हती. आज हे शिवतीर्थ पाहिल्यावर पुन्हा त्यांना प्रश्न पडला अरे बाबरे.. गद्दारांचं काय होणार? इथे एकही माणूस भाड्याने आणलेला नाही, तासाची बोली लावून आणलेला नाही. यापैकी उपस्थित असलेल्या कुणालाही विचारा त्यांना विचारल्यावर नक्कीच सांगतील तिथे "एक''टाच आहे पण इथे एकनिष्ठ बसलेले आहेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
"""" पन्नास खोक्यांचा खोकासूर """"
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, दरवर्षी परंपरेप्रमाणे आपल्या मेळाव्यानंतर रावण दहन करण्यात आले आहे. पण यावेळचा रावण वेगळा आहे. जसा काळ बदलतो तसा रावणही बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता. आता किती झाला ? डोक्यांचा नाही खोक्यांचा ५० खोक्यांचा हा खोकासूर आहें
"""" ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते कटप्पा """"
ज्यावेळी मी रुग्णालयात होतो. माझ्यावर शस्त्रक्रिया होणार होती तेव्हा माझी बोटं सुद्धा हालत नव्हती. त्यावेळी मी ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती ते कटप्पा... हो कटप्पा म्हणजे जे कट करणारे ते 'कटअप्पा'... हे कट करत होते. हा पुन्हा उभा कसा राहू शकत नाही. पण त्यांना कल्पना नाही हा उद्धव ठाकरे नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
"" महाविकास आघाडी सोबत का केली आघाडी " ?
उद्धव ठाकरे म्हणाले ही काय लपून ठेवण्याची गोष्ट नाहीये. अतिशय स्पष्टपणे सांगतो की, भाजपने पाठित वार केला आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी मी मविआ केली होती. जर मी हिंदुत्व सोडलं असेल तर तुम्ही मला सांगा सोडलं मी हिंदुत्व? पण जेव्हा मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा पहिल्या सात जणांमध्ये मी त्यांचाही मान राखला होता. तेव्हा माहिती नव्हतं का, शेजारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले मांडीला मांडी लावून बसले आहेत. का बोलताना स्वत:ची दाढी स्वत:च्या तोंडात जात होती. घेतली होती ना शपथ इकडेच... असं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

0 Comments